Goa Assembly Election  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Assembly Election 2022: पाचही राज्याच्या एक्झिट पोलवर बंदी

मतदानाचा शेवटचा टप्पा 7 मार्च रोजी असल्याने तोपर्यंत एक्झिट पोल जाहीर करता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: पुढील काही दिवसात गोव्यासह पाच राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने पाचही राज्यात एक्झिट पोल जाहीर करण्यावर बंदी घातली आहे. ही बंदी 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 7 मार्चच्या सायंकाळी 6:30 पर्यंत आहे. (Election Commission Goa Updates)

गोवा, उत्तर प्रदेश, पंजाब (Punjab), उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज गोवा दौऱ्यावर येणार आहेत. गोव्यात 14 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेश मध्ये 7 मार्चपर्यंत 7 टप्प्यांत मतदान होणार आहे. उर्वरीत राज्यात एक ते दोन टप्प्यात मतदान होणार आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा 7 मार्च रोजी असल्याने तोपर्यंत एक्झिट पोल जाहीर करता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

भाजपचे दिग्गज प्रचारात
पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजपने देशाच्या दिग्गजांना प्रचारात उतरवले आहे. गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी गोवा येथील वास्को (Vasco), डिचोली, साखळी फोंडा या ठिकाणी जाहीर सभा घेतली. शहा यांच्या साखळी व डिचोलीतील सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुसरीकडे मोदी यांनी प्रसारमाध्यमाला मुलाखत देताना पाचही राज्यात भाजपला बहुमताने सत्तेत येईल असा दावा केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

SCROLL FOR NEXT