Digambar Kamat and Babu Ajgaonkar Nominations for Goa Elections Dainik Gomantak
गोवा निवडणूक

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दिगंबर-बाबूमध्ये जुंपली

दिगंबर म्हणतात, माझे नाणे खणखणीत ; बाबू म्हणतात, वाट लावली

दैनिक गोमन्तक

मडगाव : मडगावातून यापूर्वी सातवेळा निवडून आलेले मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी गुरुवारी आठव्यांदा उमेदवारी अर्ज भरला. यापूर्वी माझ्या विरोधात रथी महारथी उभे राहिले पण सर्वांना मडगावकरांनी घरी पाठविले. माझे काम मडगावकारांना माहित आहे. ते मला आठव्यांदा निवडून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Goa Elections News Updates)

माझे नाणे खणखणीत असताना मला दुसऱ्यावर डांबर फेकण्याची गरज नाही. मी मुख्यमंत्री (CM) असताना लोकांकडे असलेली सुबत्ता आणि या सरकारने लोकांच्या हातात आणून दिलेली करवंटी हे लोकांनी पाहिले आहे. त्यामुळे गोव्यात येणारे सरकार काँग्रेसचेच (Congress) असणार, असा दावा दिगंबर कामत यांनी केला.

दुसरीकडे भाजपचे बाबू आजगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्यावर पत्रकारांशी बोलताना, दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी मागच्या 27 वर्षात मडगावची वाट लावली. 1997 साली मी पेडणेत गेलो. माझ्या कारकिर्दीत तिथे विमानतळासह मोठमोठे प्रकल्प आले. दिगंबर कामत यांनी मागच्या 27 वर्षात मडगावात कोणते प्रकल्प आणले ते त्यांनी स्पष्ट करावे, असे थेट आव्हान दिले. यावेळी त्यांच्याबरोबर राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर हेही होते. मडगावात बदल घडवून येणार आणि बाबू जायंट किलर ठरणार असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT