Ponda Congress

 
Dainik Gomantak
गोवा निवडणूक

काँग्रेसला मोठा झटका! फोंड्यात सदस्यांचा सामूहिक राजीनामा

पक्ष नव्हे तर विकासाला चालना देणारा आणि जनतेच्या समस्या जाणून घेणाऱ्या नेत्याच्या मागे आम्ही खंबीरपणे राहू असे या राजीनामा दिलेल्या काँग्रेसच्या माजी कार्यकर्त्यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

फोंडा: फोंड्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा सामूहिक राजीनामा दिला आहे. यावेळेला पक्ष नव्हे तर विकासाला चालना देणारा आणि जनतेच्या समस्या जाणून घेणाऱ्या नेत्याच्या मागे आम्ही खंबीरपणे राहू असे या राजीनामा दिलेल्या काँग्रेसच्या माजी कार्यकर्त्यांनी सांगितले. फोंड्यात काल गुरुवारी यासंबंधीच्या पत्रकार परिषदेला किशोर नाईक, हुसेन मुल्ला, अचला वेरेकर, दिलीप नाईक व बाबा काझी आदी उपस्थित होते. काँग्रेसचे फोंड्यातील अवघे काही नोंदणी झालेले कार्यकर्ते सोडल्यास बहुतांश जणांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. किशोर नाईक म्हणाले की, काँग्रेस पक्षाने गट समिती बरखास्त करताना काँग्रेसच्या कुणालाही विश्‍वासात घेतले नाही, त्यामुळे सर्वांनी सामूहिकरीत्या राजीनामा दिला.

अचला वेरेकर यांनी काँग्रेससाठी (Congress) प्रामाणिकपणे कार्य करूनही कार्यकर्त्यांची संभावना केल्यामुळेच हा राजीनामा दिला असून आता पक्ष नव्हे तर विकासकामे करणाऱ्या व्यक्तीच्या मागे आम्ही राहणार असल्याची ग्वाही दिली. हुसेन मुल्ला यांनीही काँग्रेस पक्षातील बजबजपुरीला कंटाळून सर्वांनी राजीनामा दिल्याचे नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT