Ashok Chavan  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

भाजप 'जुमला पार्टी' आहे; गोमंतकीयांनी कॉंग्रेसलाच मत द्यावे: अशोक चव्हाण

कॉंग्रेस नवीन चेहऱ्यांना संधी देत नाही, या भाजपच्या आरोपावर स्पष्टीकरण देताना चव्हाण म्हणाले, यावेळेस आम्ही अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.

Akash Umesh Khandke

पणजी: गोव्यात सरकार स्थापन करण्यासाठी कॉंग्रेस पार्टीला कुणाचीही मदत घ्यावी लागणार नाही. कॉंग्रेस-गोवा फॉरवर्ड युती एकहाती सत्ता मिळवेल याची मला खात्री आहे. भाजप 'जुमला पार्टी' आहे. त्यामुळे मी गोव्यातील लोकांना कॉंग्रेसलाच मत देण्याचे आवाहन करतो, असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे गोमन्तकला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत लोकांचा जनादेश मिळून सुद्धा कॉंग्रेसला (Congress) सत्ता स्थापन करता आली नाही. यावेळेस कॉंग्रेस सत्तेत येईल का? या प्रशांचे उत्तर देताना चव्हाण म्हणाले, आम्ही सरकार स्थापन करू शकलो नाही, हे मी मान्य करतो. मात्र यावेळेस कॉंग्रेस सत्तेत येईल. आम्हाला जनादेश मिळून सुद्धा भाजपने सरकार स्थापन केले. हा गोव्यातील लोकांचा अपमान आहे. भाजपमुळे (BJP) गोव्याचा विकास खुंटला आहे. कॉंग्रेसला संधी मिळाल्यास आम्ही नक्कीच गोव्याचा विकास करू.

सध्या पाच राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. कॉंग्रेसला आगामी निवडणुकीत कितपत यश मिळेल, याचे उत्तर देताना चव्हाण म्हणाले, मी उर्वरीत राज्यात दौरा केलेला नाही म्हणून मी त्यावर भाष्य करणार नाही, मात्र गोव्यात कॉंग्रेसला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कॉंग्रेस नवीन चेहऱ्यांना संधी देत नाही, या भाजपच्या आरोपावर स्पष्टीकरण देताना चव्हाण म्हणाले, यावेळेस आम्ही अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. पण आम्ही जुन्या नेत्यांना दुर्लक्षित केलेले नाही. आमच्याकडे नवीन चेहरे तसेच अनुभवी लोक सुद्धा आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT