Allegation of money distribution on Alemao Sisters over Goa Election Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election News: पैसे वाटपावरून नावेलीत तणाव

वालंकांच्या बहिणींवर आरोप; 'आप' कार्यकर्त्यांचा अधिकाऱ्यांना घेराव

दैनिक गोमन्तक

मडगाव:  तृणमूल, आप, काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी अशी पंचरंगी लढत असलेल्या ‘हाय प्रोफाईल’ नावेली मतदारसंघात आज सकाळपासून तणाव होता. सायंकाळी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार वालंका आलेमाव यांच्या बहिणी पैसे वाटतात असा आरोप झाल्याने वातावरण पुन्हा चिघळले. यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातल्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.

नावेलीत तृणमूल काँग्रेसच्या (congress) उमेदवार वालंका आलेमाव यांच्या बहिणींनी पैसे वाटल्याचा आरोप प्रतिमा कुतिन्हो आणि दिग्विजित चव्हाण या उमेदवारांनी केला. इतकेच नाही, तर या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्‍यांना घेरावही घातला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ ते घटनास्थळी दाखल झाले. आलेमाव बहिणी एका घरात घुसून बसल्या आहेत त्यांना बाहेर काढण्याची मागणी आंदोलकांनी केली. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत येथे तणाव होता.

तृणमूल कार्यकर्त्यांकडून अपशब्द

सकाळी हाउसिंग बोर्डमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार रेहान मुजावर यांच्या समर्थकांना तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी अपशब्द उच्चारल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून हा तणाव थंड केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT