Abhishek Banerjee Dainik Gomantak
गोवा निवडणूक

भाजपकडून पैसे घ्या, पण मत मात्र तृणमूल काँग्रेसलाच द्या: अभिषेक बॅनर्जी

बॅनर्जी यांनी गुरवारी कुंभारजुवा आणि हळदोणा येथे तृणमूल कॉंग्रेसच्या (TMC) जाहीर सभेत भाषण केले.

दैनिक गोमन्तक

पणजी: भाजपकडून पैसे घ्या, पण मत मात्र तृणमूल काँग्रेसलाच द्या, असे आवाहन तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी गोव्याच्या जनतेला केले आहे. बॅनर्जी यांनी गुरवारी कुंभारजुवा आणि हळदोणा येथे तृणमूल कॉंग्रेसच्या (TMC) जाहीर सभेत भाषण केले. (TMC Goa News)

गोव्यातील (Goa) लोकांना संबोधताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले, भाजपने 2017 साली तुमचा विश्वासघात केला आहे. तुमच्या विश्वासाचा आणि प्रेमाचा कॉंग्रेस आणि भाजपने व्यापार केला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत तुम्ही कॉंग्रेसला मतदान केले होते, मात्र काँग्रेसने जनतेच्या प्रेमाशी आणि विश्वासाशी खेळ केला. गोव्यात पक्षांतरचे आणि आमदार खरेदी-विक्रीचे राजकारण मोठ्याप्रमाणात सुरू आहे. यावर आळा घालणे गरजेचे आहे. स्वच्छ राजकारणासाठी आणि स्थिर सरकारसाठी तृणमूल कॉंग्रेसला मत द्या.

दरम्यान, भिषेक बॅनर्जी यांनी भाजपवर बोचरी टीका केली. ते म्हणाले, दुहेरी इंजिन म्हणजे दुहेरी लूट. दुहेरी इंजिनच्या दुर्घटनेमुळे तरुणांना चांगली नोकरी मिळवण्यासाठी 20 लाख रुपये मोजावे लागत आहेत. यावेळेस त्यांनी भाजपला (BJP) खुले आवाहन दिले की, बंगालमधील कल्याणकारी योजनांपेक्षा भाजपच्या योजना चांगल्या आहेत हे त्यांनी सिद्ध केले तर मी राजकारणातून संन्यास घेईन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT