Pratima Coutinho Dainik Gomantak
गोवा निवडणूक

..म्हणून 'आप'च्या नावेलीतील उमेदवार कुतिन्हो पत्रकार परिषदेत भावनाविवश झाल्या

प्रतिमा कुतिन्हो भर पत्रकार परिषदेत (Press Conference) ओक्साबोक्शी रडू लागल्या.

दैनिक गोमन्तक

पणजी: कॉंग्रेसचे उमेदवार आवेर्तान फुर्तादो यांनी आम आदमी पक्षाच्या नावेलीतील उमेदवार प्रतिमा कुतिन्हो यांच्या चारित्र्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने प्रतिमा कुतिन्हो भर पत्रकार परिषदेत (Press Conference) ओक्साबोक्शी रडू लागल्या. (AAP Goa Election Updates)

आवेर्तानसारख्या व्यक्तींना निवडून येण्याचा काहीही अधिकार नाही. तसेच अशी व्यक्ती मला महिला म्हणून सन्मान देत नसेल तर नावेलीतील महिलांना काय मान देणार, असा प्रश्नही प्रतिमा यांनी केला. दरम्यान, आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनीही ट्विट करून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. फुर्तादो यांनी आपच्या महिला उमेदवारा विषयी अशी अश्लाघ्य टिपण्णी करणे अतिशय घृणास्पद आहे, असे ही त्यांनी नमूद केले आहे.

प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या होत्या की, भाजपने काँग्रेसच्या टिकीटावर माजी मंत्री आवेर्तान फुर्तादो यांना उमेदवारी दिली होती आणि जर ते जिंकले तर फुर्तादो पुन्हा भाजपमध्ये (BJP) सामील होतील. शिवाय, फुर्तादो आणि भाजपमध्ये एक गुप्त करार देखील झाला आहे ज्याच्या अंतर्गत भाजप सत्तेत आल्यास आवेर्तान फुर्तादो यांना क्रीडा मंत्रीपद देणार आहे.

प्रतिमा कुतिन्हो याच्या दाव्याला खोडून काढताना आवेर्तान फुर्तादो यांनी त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले, प्रतिमाचे डोके जागेवर नाही असे वाटते. त्यांना जे वाटते ते त्या बोलतात. कुतिन्हो यांनी माझी माफी मागावी अन्यथा मी त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करेन. "मागील 25 वर्षांपासून भाजप माझ्या विरोधात आहे. मी त्यांच्या दुष्कृत्यांविरोधात बोलले की ते माझा आवाज दाबण्यासाठी माझ्यावर बदनामीचा खटला दाखल करतात", असे प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT