Goa Christmas Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

गोव्यात नाताळचा उत्साह! मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडून शांतता व एकात्मतेचा संदेश; आर्चबिशपांनी केली शांततेची प्रार्थना

Christmas Celebrations Goa: या मंगल दिनानिमित्त गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीय जनतेला नाताळच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात

Akshata Chhatre

Goa Christmas celebrations news: नाताळच्या पूर्वसंध्येला संपूर्ण गोवा रोषणाईने उजळून निघाला असून, सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या मंगल दिनानिमित्त गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीय जनतेला, विशेषतः ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात.

गोव्याची ओळख ही नेहमीच शांततापूर्ण सहअस्तित्वासाठी राहिली आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सर्व नागरिकांना समाजात सामंजस्य, आदर आणि एकता वाढवून ही मूल्ये जोपासण्याचे आवाहन केले. "नाताळचा हा सण आपल्याला प्रेम आणि सौहार्दाने जगण्याची आठवण करून देतो आणि गोव्याच्या आदर्श जीवनशैलीला अधिक बळकट करतो," असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

गोव्याचे राज्यपाल पुसपती अशोक गजापती राजू यांनीही नाताळच्या पूर्वसंध्येला राज्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या संदेशात ते म्हणाले की, नाताळ हा काळ कुटुंब आणि मित्रांनी एकत्र येऊन आनंद वाटून घेण्याचा आहे. "येशू ख्रिस्ताने दिलेल्या प्रेम आणि करुणेच्या शिकवणीनुसार आपण आपले जीवन जगण्याचा संकल्प करूया आणि शांतता, सौहार्द व एकता नांदेल अशा गोव्याच्या निर्मितीसाठी एकत्र काम करूया," असे आवाहन राज्यपालांनी केले.

गोवा आणि दमणचे आर्चबिशप फिलिप नेरी कार्डिनल फेराव यांनीही नाताळच्या पूर्वसंध्येनिमित्त आपला संदेश जारी केला आहे. सध्याच्या विस्कळीत जगाला हा सण शांतता प्रदान करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. देवाने स्वतःला नम्र करून मानवी सृष्टीचा भाग बनवून घेतले, जेणेकरून या सृष्टीला पुन्हा ईश्वराशी जोडता येईल, असे सांगत त्यांनी मानवाप्रती असलेल्या ईश्वरी प्रेमाची आठवण करून दिली. नाताळच्या पूर्वसंध्येला गोव्यातील विविध चर्चमध्ये होणाऱ्या मध्यरात्रीच्या प्रार्थनांची तयारी पूर्ण झाली असून, पर्यटकांच्या गर्दीमुळे गोव्याचे रस्ते आणि समुद्रकिनारे गजबजून गेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT