Tihar Jail Dainik Gomantak
ग्लोबल

तिहार जेल जगातील 5 व्या क्रमांकाचे सर्वात मोठे 'तुरुंग'; टॉप 10 मध्ये अमेरिकेचे 6 जेल; जाणून घ्या नंबर 1

Top 10 Biggest Jails In World: जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुरुंग आहेत परंतु त्या सर्वांचा उद्देश एकच आहे.

Manish Jadhav

Top 10 Biggest Jails In World: तुरुंग हे सामाजिक न्यायाचे प्रतीक मानले जाते. जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुरुंग आहेत परंतु त्या सर्वांचा उद्देश एकच आहे. अनेक तुरुंग त्यांच्या आकारमानासाठी आणि कैदी ठेवण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात. चला तर मग जाणून घेऊया जगातील 10 सर्वात मोठे तुरुंग कोणते आहेत आणि त्यांची क्षमता किती आहे.

दरम्यान, जगातील 10 मोठ्या तुरुंगांमध्ये भारतातील तिहार तुरुंगाचाही समावेश आहे. राजधानी नवी दिल्लीतील तिहार तुरुंग या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. वृत्तानुसार, 400 एकर जागेवर बांधलेल्या या तुरुंगात 19,500 कैदी आहेत. जगातील सर्वात मोठ्या तुरुंगाबद्दल बोलायचे झाल्यास, ते फिलिपाइन्समधील न्यू बिलिबिड तुरुंग आहे. 1940 मध्ये बांधलेल्या या कमाल सुरक्षा सुविधेत 28,500 कैदी आहेत.

दुसऱ्या क्रमांकावर तुर्की तुरुंग

दुसऱ्या क्रमांकावर तुर्कस्तानमधील सिलिव्हरी तुरुंग आहे जिथे कैद्यांची संख्या 22,000 आहे. ही युरोपमधील सर्वात मोठी सुधारक सुविधा आहे आणि आधुनिक उच्च सुरक्षा व्यवस्थांनी सुसज्ज आहे. तिसऱ्या क्रमांकावर थायलंडचे क्लोंग प्रेम सेंट्रल तुरुंग आहे, ज्याची क्षमता 20,000 कैद्यांपर्यंत आहे. इथे बंदिस्त कैद्यांपैकी सुमारे 30 टक्के विदेशी आहेत. कोविड-19 दरम्यान, त्यातील पाच इमारतींचे रुग्णालयात रुपांतर करण्यात आले होते.

अमेरिकेच्या 6 तुरुंगांचा समावेश आहे

टॉप 10 सर्वात मोठ्या तुरुंगांमध्ये अमेरिकेतील 6 तुरुंगांचा समावेश आहे. या यादीत लॉस एंजेलिस काउंटी जेल चौथ्या क्रमांकावर आहे, न्यूयॉर्क शहरातील रिकर्स आयलंड जेल सहाव्या आणि टेक्सासमधील हॅरिस काउंटी जेल सातव्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी, फिनिक्स, ऍरिझोना इथे स्थित मेरीकोपा काउंटी जेल आठव्या क्रमांकावर आहे, फिलाडेल्फियाची कुरन फ्रॉमॅनहोल्ड जेल नवव्या क्रमांकावर आहे आणि फ्लोरिडाची मेट्रो वेस्ट डिटेन्शन केअर 10 व्या क्रमांकावर आहे.

10 सर्वात मोठ्या तुरुंगांची यादी

1. न्यू बिलिबिड जेल (फिलीपिन्स)

2. सिलिव्हरी जेल (तुर्की)

3. क्लोंग प्रेम सेंट्रल प्रिजन (थायलंड)

4. लॉस एंजेलिस काउंटी जेल (यूएसए)

5. तिहार जेल (भारत)

6. रायकर्स जेल (यूएसए)

7. हॅरिस काउंटी जेल (यूएसए)

8. मेरीकोपा काउंटी जेल (यूएसए)

9. कुरन-फ्रॉमहोल्ड करेक्शनल फॅसिलिटी (यूएसए)

10. मेट्रो वेस्ट डिटेन्शन सेंटर (यूएसए)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

SCROLL FOR NEXT