World Mosquito Day Dainik Gomantak
ग्लोबल

World Mosquito Day: मलेरियाचे डास होऊ नयेत म्हणून 'हे' उपाय करा

World Mosquito Day: त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार वाढीस लागतात.

दैनिक गोमन्तक

World Mosquito Day: दिवसेंदिवस डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. याचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आपण विविध उपाययोजना करत असतो. महत्वाचे म्हणजे मलेरियाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आणि त्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक डास दिवस साजरा करतात.

आज जागतिक डास दिवस. दरवर्षी हा दिवस संपूर्ण जगभर 20 ऑगस्टला साजरा करतात. 1897 मध्ये सर रोनाल्ड रॉस यांनी डास आणि मलेरियाचा होणारा प्रसार यांच्यात संबंध जोडत जगाला मलेरियाचा प्रतिबंध करण्यासाठी एक नवीन आशेचा किरण दिला.

रॉस यांनी मादी डास माणसांमध्ये मलेरियाचा प्रसार करते हा शोध लावला होता. त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा संपूर्ण जगभर आज साजरा केला जातो. जनसामान्यांमध्ये मलेरिया का होतो, कसा होतो आणि मलेरिया झाला तर काय काळजी घ्यावी याबद्दल जागरुकता निर्माण करणे हा उद्देश जागतिक डास दिवस साजरा करण्यापाठीमागे आहे.

याबरोबरच 1939 पासून लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन दरवर्षी ब्रिटिश डॉक्टरांच्या कामाला आदरांजली देण्यासाठी आणि मलेरिया पासून संरक्षण कसे करावे याची जागरुकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करतात.

जाणून घेऊयात डासांचे विविध प्रकार

1. आसियान टायगर मॉस्कि्युटो

2. येलो फिव्हर मॉस्कि्युटो

3. मार्श मॉस्कि्युटो

4. क्युलेक्स

5. कॉमन हाऊस मॉस्कि्युटो

6. एडिस

7. क्युलेक्स ट्रासालिस

8. एडिस वेक्सान्स

9. एडिस ट्रीसेरीटस

अशाप्रकारे रोखू शकता डासांची पैदास

1. पाणी साचू देऊ नका

तुमच्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला कुठे पाणी साचत असेल तर पाणी साचू देऊ नका. ज्या ज्या ठिकाणी पाणी साचते त्या त्या ठिकाणी डासांचे प्रमाण वाढते. डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होते.

जुने टायर, भांडी , कुंड्या याबरोबरच तुमच्या घरासमोरील बागेत असणारे कारंजे अशा सर्व ठिकाणी पाणी साचते आणि डासांचे प्रमाण वाढते. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार वाढीस लागतात.

2. भडक रंगाची कपडे घालू नका

बाहेर जाताना तुम्ही जर भडक रंगाचे कपडे घातले तर तुम्हाला जास्त डास चावण्याची शक्यता आहे. भडक रंगाकडे डास जास्त आकर्षित होतात. याबरोबरच डास चावू नये म्हणून तुम्ही जाड आणि थोडे सैल कपडे घालू शकता.

3. डास प्रतिबंधक वापरा

मलेरिया, डेंग्यूपासून संरक्षण करण्यासाठी डास प्रतिबंधक वापरु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT