ALcohol
ALcohol Dainik Gomantak
ग्लोबल

WHO ने दिली चेतावनी! किती मद्यप्राशन करणे आरोग्यासाठी योग्य ?

दैनिक गोमन्तक

WHO: मद्यप्राशन करण्याबाबतीत आतापर्यत नवनवीन शोध लावले गेले आहेत. याआधी लावलेल्या संशोधनामध्ये वेगवेगळे दावे करण्यात आले आहेत. आता मात्र जागतिक आरोग्य संघटनेने अर्थात WHO ने मद्यप्राशन करण्याबाबतीत लोकांना चेतावनी दिली आहे.

दारु( Alcohol)चा पहिला घोट घेतल्यापासूनच कॅन्सरचा होण्यास सुरुवात होते असा दावा WHO ने केला आहे.दारु आरोग्यासाठी हानिकारक नाही असे म्हणणारा कोणताही पुरावा नसल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

दारु पिण्याचा असा कोणताही मापदंड नाही. ज्याद्वारे हे सांगितले जाऊ शकते की या प्रमाणात घेतलेली दारु आरोग्यासाठी योग्य असेल असे अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या द लास्टेंट पब्लिक हेल्थमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. WHO न केलेल्या अभ्यासानुसार , दारुमुळे 7 प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढतो. यामध्ये माउथ कॅन्सर, थ्रोट कॅन्सर, लिवर कॅन्सर( Cancer), ऐसोफैगस कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, कोलन कॅन्सरचा समावेश होतो.

दरम्यान, इथॅनॉल जैविक तंत्राच्या माध्यमातून दारुमुळे कॅन्सर होतो. तुम्ही किती कमी प्रमाणात दारुचे सेवन करता याने कॅन्सरचा धोका कमी होत नाही, असा दावा करणारा कोणताही पुरावा आमच्या हाती लागमर नाही . मात्र आम्ही हे खात्रीपूर्वक सांगू शकतो की दारुचा पहिला थेंब शरीरात गेल्यापासून कॅन्सर होण्यास सुरुवात होते , असे जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT