New Zealand PM Jacinda Ardern Dainik Gomantak
ग्लोबल

असं काय घडलं! न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी रद्द केलं स्वत:चंच लग्न

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी आपल्या वयक्तिक आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय बदलला

दैनिक गोमन्तक

कोरोना संसर्गामुळे देशात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न (PM Jacinda Ardern) यांनी आपल्या आयुष्यातील मोठा निर्णय बदलला आहे. त्यांनी त्यांचे लग्न कोविडच्या वाढत्या प्रकरणामुळे रद्द केले आहे. खुद्द पंतप्रधान जॅसिंडा यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या या निर्णयाची माहिती दिली. (New Zealand PM Jacinda Ardern cancels her wedding)

कोविड-19 निर्बंध लावण्याचा प्रयत्न

न्यूझीलंडमध्ये एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी ऑकलंडला गेलेल्या एकाच कुटुंबातील नऊ जणांना कोरोना विषाणूच्या (Covid-19) ओमिक्रॉन (Omicron) प्रकाराची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर नवीन कोविड-19 निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . देशाच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी आज रविवारी ही घोषणा केली. न्यूझीलंडमध्ये कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी, रंग-आधारित धोरणांतर्गत सोमवारपासून "रेड सेटिंग" लागू होणार ज्यामध्ये मास्क घालणे आवश्यक असणार आहे. आणि कार्यक्रमात लोकांची संख्या मर्यादित करणे यासारखे कडक निर्बंध लावण्यात येणार असल्याची माहिती न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी आज दिली.

रेड म्हणजे लॉकडाउन नाही

"लाल म्हणजे लॉकडाउन नाही. व्यापारी दुकानं खुले राहू शकतात आणि लोकांना त्यांच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना भेटण्याचे आणि देशभर फिरण्याचे स्वातंत्र्य असेल. डेल्टा फॉर्मप्रमाणेच ओमिक्रॉनचा संसर्ग पहिल्या टप्प्यावरच कमी करण्याची आमची योजना आहे. ज्यामध्ये टेस्ट केल्या जातील, संपर्कात असलेल्या लोकांचा शोध घेऊ, त्यांना वेगळे ठेवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉन पसरणार नाही, असे आर्डर्न यांनी सांगितले.

ओमिक्रॉनने महामारीचे स्वरूप घेतले नाही

न्यूझीलंड हा अशा काही देशांपैकी एक आहे जिथे कोरोना संसर्ग ओमिक्रॉन या नवीन प्रकाराने महामारीचे रूप घेतलेले नाही, परंतु आर्डर्न यांनी कबूल केले की हा प्रकार अधिक संसर्गजन्य असल्याने त्याचा प्रसार रोखणे कठीण आहे. म्हणून न्यूझीलंड सरकारने कोरोना व्हायरसबाबत सावधगिरी बाळगून नियमांमध्ये बदल केला आहे. आणि म्हणूनच पंतप्रधान आर्डर्न यांनी आपल्या वयक्तिक आयुष्याचा निर्णय बदलला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT