condom  Dainik Gomantak
ग्लोबल

युक्रेन युद्धादरम्यान रशियामध्ये कंडोमची मागणी का वाढली?

युद्धाच्या काळात रशियामध्ये कंडोमच्या विक्रीत 170% वाढ

दैनिक गोमन्तक

मॉस्को: रशिया युक्रेनवर जवळपास महिनाभरापासून हल्ला (Russia-Ukraine War) करत आहे. या युद्धाचा परिणाम जगभरात दिसून येत आहे. दरम्यान, एक आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. युद्धाच्या काळात रशियामध्ये कंडोमची विक्री अचानक वेगाने वाढली आहे. एका ब्रिटीश वृत्तपत्रानुसार, देशात कंडोमच्या विक्रीत 170 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेरिका (America) आणि पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांनंतर रशियाचे लोक बाजारात कंडोम नसल्यामुळे घाबरले आहेत. त्यामुळे साठा खरेदी केला जात आहे.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, रशियाच्या लोकांना भीती आहे की निर्बंधांचा परिणाम कंडोमच्या किमतीवरही होऊ शकतो. त्यामुळे बाजारात कंडोमचा पुरवठाही कमी होऊ शकतो. जिथे रशियात अनेक कंपन्यांनी आपला व्यवसाय बंद केला आहे. तिथे मेडिकल देखील बंद आहेत. मात्र असे असताना, ब्रिटीश कंडोम निर्माता रेकिटने तेथे आपला व्यवसाय (Business) सुरू ठेवला आहे. रशियन ऑनलाइन रिटेलर वाइल्डबेरीजने ही माहिती दिली आहे.

केमिस्टकडून कंडोमची विक्री 32 टक्क्यांनी वाढली

रशियन फार्मसी चेन 36.6 PJSC ने म्हटले आहे की कंडोमच्या (Condoms) विक्रीत 26 टक्के वाढ झाली आहे. त्याचबरोबर केमिस्टच्या कंडोमच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 32 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रशियन सुपरमार्केटच्या मते, कंडोमच्या विक्रीत 30 टक्के वाढ झाली आहे.

मास्कोमध्ये कंडोमचा स्टॉक गोळा

मॉस्कोमधील प्रौढ स्टोअरची सह-भागीदार येसेनिया शमोनिना यांनी सांगितले की, लोक भविष्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टाने कंडोम गोळा करत आहेत. देशात कंडोमच्या किमतीही वाढल्या आहेत. पाश्चिमात्य चलनाच्या संदर्भात रशियन रुबल कमकुवत झाला आहे, ज्यामुळे वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT