Ilhan Omar Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिकन संसदेत भारतविरोधी ठराव मांडणाऱ्या कोण आहेत इल्हान उमर

अमेरिकेचे खासदार इल्हान उमर यांनी भारताकडून होत असलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा निषेध करण्यासाठी अमेरिकन संसदेत ठराव मांडला आहे.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेचे खासदार इल्हान उमर यांनी भारताकडून होत असलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा निषेध करण्यासाठी अमेरिकन संसदेत ठराव मांडला आहे. भारताला धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करणारा देश म्हणून घोषित करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक अल्पसंख्याकांवरील मानवी हक्कांच्या उल्लंघनासाठी भारत सरकारला जबाबदार धरले पाहिजे, असे इल्हान यांनी म्हटले आहे. इल्हान यांच्या प्रस्तावाला खासदार रशिदा तलेब आणि जुआन वर्गास यांचा पाठिंबा मिळाला आहे.

अमेरिकेने भारताला विशेष चिंतेचा देश म्हणून घोषित केले पाहिजेः इल्हान

ठरावात म्हटले आहे की, 'भारत सरकार अलीकडच्या काळात मुस्लिम (Muslim), ख्रिश्चन, शीख आणि दलित यांच्याविरुद्ध दडपशाही धोरणांना प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्रता कायद्यानुसार भारताला (India) विशेष चिंतेचा देश म्हणून औपचारिकपणे घोषित करण्याची वेळ आली आहे.'

एप्रिलमध्ये भारताने इल्हान यांना लक्ष्य केले होते

एप्रिल 2002 मध्ये पाकव्याप्त काश्मीरला भेट दिल्याबद्दल भारत सरकारकडून इल्हान यांच्यावर टीका करण्यात आली होती. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एप्रिल 2022 मध्ये सांगितले होते की, 'असा नेता ज्याला घरामध्ये संकुचित मानसिकतेचे राजकारण करायचे आहे, इल्हन त्याचे नेतृत्व करतात. परंतु आपल्या प्रादेशिक अखंडतेचे आणि सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणे हा आमचा मुद्दा आहे. आम्ही पाकव्याप्त काश्मीरची त्यांची भेट निषेधार्ह मानतो.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

Asian Games 2026: ब्लॉकबस्टर फायनल होणार! श्रीलंकेला 124 धावांनी धूळ चारत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश, आता जेतेपदासाठी पाकिस्तानशी होणार 'कांटे की टक्कर'

Success Motivation: 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..!'; अपयश आलं तरी थांबू नका, प्रयत्नांची साथच यशाचा मार्ग दाखवते

Mental Health Rehabilitation: मानसिक आजारावर उपचार झाले, पण पुढे काय?; रुग्णाच्या पुनर्वसनासोबत कुटुंबालाही आधाराची गरज

IND vs WI: गुवाहाटीत महापराक्रम! 55 वर्षांच्या वनडे क्रिकेट इतिहासात कधीही घडलं नाही, ते घडलं; भारत-वेस्टइंडीज सामना ठरला क्रिकेट विश्वातील 'सुवर्णपान'

SCROLL FOR NEXT