Weight loss| Pizza Dainik Gomantak
ग्लोबल

Weight loss: अजब-गजब! डाएटिंग नाही तर रोज पिझ्झा खाऊन वजन केले कमी

दररोज पिझ्झाचे 10 स्लाईस खाऊन वजन कमी केले.

दैनिक गोमन्तक

Weight Loss: निरोगी आरोग्य राखण्यासाठी अनेक लोक जंक फूड खाणे टाळतात. निरोगी आरोग्यासाठी नेहमी व्यायाम करावा असे अनेकदा सांगितले जाते. पण एका फिटनेस ट्रेनरचा दावा आहे की त्याने वजन कमी करण्यासाठी डाएटिंग नाही तर चक्क दिवसातुन 3 वेळा रोज पिझ्झा खाल्ला आहे.

तुम्हाला ही गोष्ट वाचायला थोडी विचित्र वाटेल पण ही गोष्ट खरी आहे. फिटनेस ट्रेनरने त्याचे जुने आणि नवीन फोटोही सोशल मिडियावर (Social Media) शेअर केले आहेत. यामध्ये त्याचे वजन कमी झालेले दिसत आहे.

  • कोण आहे हा फिटनेस ट्रेनर?

वजन कमी करणाऱ्या फिटनेस ट्रेनरचे नाव रायन मर्सर आहे. रायन मर्सर आयर्लंडला राहतो. 34 वर्षीय रायनने दावा केला की त्याने 30 दिवस फक्त तीन वेळा पिझ्झा खाल्ला आणि वजन कमी केले. रायनने 30 दिवस दररोज पिझ्झाचे 10 स्लाईस खाल्ले आहे.

त्याने पिझ्झा खाऊन सुमारे 3.4 (7.5 LBS) वजन कमी केले आहे. कॅलरी कमी न होता आणि तुमचे आवडते पदार्थ न सोडता वजन कमी करणे शक्य आहे हे लोकांना दाखवण्यासाठी रायनने हे चॅलेन्ज स्वीकारले होते.

रायनने यासाठी आपला डाएट (Diet) खूप चांगल्या पद्धतीने प्लॅन केला होता. ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरमध्ये फक्त त्याने पिझ्झा खाल्ला आहे. त्याने असे सांगितले की प्रत्येकाचे शरीर सारखे नसते आणि प्रत्येकाच्या शरीराच्या गरजाही वेगळ्या असतात, यामुळे कोणीही माझा डाइट प्लॅन फॉलो करु नका.

रायनने एका मुलाखती दरम्यान सांगितले की, 'जेव्हा फिटनेसच्या गोलचा विचार केला जातो, तेव्हा जानेवारीचा थंडीचा महिना प्रत्येकासाठी खूप कठीण असतो. म्हणून मी माझे फिटनेस गोल पूर्ण करण्यासाठी जानेवारी महिना निवडला होता. मी जानेवारी महिन्यापासून पासून माझा वजन कमी करण्याचा प्रवास सुरू केला.

कॅलरी डेफिसिटी कमी राहण्यासाठी पिझ्झा बाहेरून मागवला नाही तर घरीच तयार केला. कॅलरीची कमतरता असूनही, मी दिवसातून दोन पिझ्झा खाऊ शकत होतो. कॅलरी संतुलित करून, मी पिझ्झाचे 10 स्लाइस खाल्ले पण मी व्यायाम (Yoga) करणे थांबवले नाही आणि फिजिकल अॅक्टिव्ह राहिलो.

Ryan Mercer Nutrition & PT

रायन पुढे सांगितले, 'पिझ्झा खाणे देखील बजेटमध्ये आहे. पिझ्झाची किंमत दररोज 885.8 रुपये (10 युरो) आणि स्नॅक्सची किंमत दररोज 266 रुपये (3 युरो) होती. पिझ्झा हा माझा आवडता पदार्थ आहे. म्हणून मी तो 30 दिवस मोठ्या आनंदाने खाल्ला, पण मला पिझ्झाचे विविध प्रकार खायला आवडतात.

Pizza

रायन पुढे म्हणाला, 'मी माझा आहार खूप कॅल्क्युलेशन करुन तयार केला होता. ज्यामुळे मला माझे गोल गाठण्यात मदत मिळाली.मी सोमवार ते शुक्रवार 1800 ते 2100 कॅलरीज आणि शनिवार-रविवार 2700 कॅलरीज आहारात घेत होतो. मी दररोज 140 ग्रॅम प्रथिन्यांचे सेवन करत होतो आणि दररोज फळे आणि भाज्यांचा देखील आहारात समावेश करत होतो

Fruits & Vegetable

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT