Vladimir Putin Dainik Gomantak
ग्लोबल

व्लादिमीर पुतीन यांनी अफगाण निर्वासितांना म्हटलं, 'दहशतवादी'

आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन (Vladimir Putin) यांनी अफगाणिस्तानमधून (Afghanistan) बाहेर पडणाऱ्या नागरिकांचा विरोध केला आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) अशरफ घनी यांचे लोकशाहीवादी सरकार तालिबानने उलथवून आपली हुकुमशाही राबवणारे शासन स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. यातच आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन (Vladimir Putin) यांनी अफगाणिस्तानमधून (Afghanistan) बाहेर पडणाऱ्या नागरिकांचा विरोध केला आहे. शरणार्थींच्या वेषात आतंकवादी देशाच्या बाहेर पडू नयेत अस पुतीन म्हणाले आहेत. रशियन वृत्तसंस्थेने यासंबंधीची माहिती दिली आहे.

काही पाश्चिमात्य देशांनी अफगाणिस्तानातून निर्वासितांना शेजारच्या मध्य आशियाई देशांमध्ये पाठवण्याच्या वक्तव्यांसबंधी टीका केली आहे. अध्यक्ष म्हणाले की, रशिया माजी सोव्हिएत मध्य आशियाई देशांतील रहिवाशांना व्हिसामुक्त प्रवासाची परवानगी देतो, परंतु दहशतवाद्यांचा रशिया विरोध करतो. "दहशतवाद्यांनी निर्वासितांच्या वेशात येथे यावे अशी आमची इच्छा नाही," असे पुतीन यांनी टास न्यूज एजन्सीला सांगितले.

गेल्या आठवड्यात वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, शरणार्थींना व्हिसा देण्याची प्रक्रिया अमेरिका आणि युरोपमध्ये सुरु केली जात आहे. अमेरिकेने आपल्या सरकारसाठी काम करणाऱ्या अफगाणांना तात्पुरती निवास व्यवस्था देण्यासाठी अनेक देशांशी गुप्त चर्चा केली आहे.

दुसरीकडे, तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी दावा केला आहे की, बागलाण प्रांतातील पुल-ए-हिसल, बन्नू, देह सालेह जिल्हे पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांना उत्तर आघाडीच्या सेनानींकडून बाहेर काढण्यात आले. तालिबानचा दावा आहे की, त्यांच्या लढवय्यांनी उत्तर आघाडीच्या लोकांना परत केले आहे. यासह तालिबानने थेट अमेरिकेला धमकी दिली आहे. तालिबानने म्हटले आहे की, जो बायडन सरकारने 31 ऑगस्ट पर्यंत अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेतले नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT