Massive Fight At Chicago Airport Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: लाथा-बुक्क्या अन् महिलांनी एकमेकींचे केस ओढले; शिकागो विमानतळ बनले 'आखाडा'

Chicago Airport: सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शिकागोच्या ओ'हारे विमानतळावरील आहे.

Manish Jadhav

Massive Fight At Chicago Airport: सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शिकागोच्या ओ'हारे विमानतळावरील आहे. या व्हिडिओमध्ये डझनहून अधिक लोक भांडताना दिसत आहेत. लोक एकमेकांना लाथा-बुक्के मारत आहेत. या मारहाणी प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत ओ'हरे पोलिसांनी माहिती दिली आहे.

दरम्यान, हाणामारीची घटना सोमवारी घडल्याचे पोलिसांनी सांगितले. एअरपोर्टच्या बॅगेज क्लेम एरियामधून काही गोंधळाचा आवाज ऐकू आला, जिथे लोक एकमेकांना मारहाण करत होते. या भांडणात डझनहून अधिक जण सहभागी झाले होते. यामध्ये अनेक मुलीही (Girls) होत्या. मुली एकमेकींना लाथा-बुक्क्या मारत होत्या.

24 वर्षीय मुलीला धक्काबुक्की

पोलिसांनी सांगितले की, घटनेदरम्यान दोन मुलांनी एका 24 वर्षीय मुलीला धक्काबुक्की केली. त्यापैकी एकाचे नाव 18 वर्षीय ख्रिस्तोफर हॅम्प्टन असे असून दुसऱ्याचे नाव 20 वर्षीय टेंब्रा हिक्स असे आहे. हॅम्प्टन आणि हिक्स या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांवर चिथावणी दिल्याचा आरोप आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे.

सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड नाही - CDA

त्याचवेळी, शिकागो विमान वाहतूक विभागाने विमानतळावरील हल्ल्याच्या या घटनेबाबत एक निवेदन जारी केले आहे. शिकागो डिपार्टमेंट ऑफ एव्हिएशन (CDA सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड करत नाही, असे त्यात नमूद केले आहे. सुरक्षेला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. आम्ही O'Hare-Midway International Airport आणि Chicago Police Department सोबत जवळून काम करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT