Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

VIDEO: पाकिस्तानच्या कराची विद्यापीठात स्फोट, 3 चिनी नागरिकांसह 4 ठार

पाकिस्तानमधील (Pakistan) कराची विद्यापीठात मंगळवारी मोठा स्फोट झाला.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानमधील कराची विद्यापीठात मंगळवारी मोठा स्फोट झाला. या स्फोटात अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या स्फोटाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा स्फोट कराची विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एका कारमध्ये झाला. ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

जिओ टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, कराची विद्यापीठाच्या कन्फ्युशियस इन्स्टिट्यूटजवळ एका व्हॅनमध्ये स्फोट झाला. मृतांमध्ये तीन चिनी नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या नव्या शाहबाज शरीफ सरकारपुढे नव्या अडचणी निर्माण होऊ शकतात. पाकिस्तानमधील गुंतवणूक पाहता चीन सातत्याने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत आहे.

प्रसारमाध्यमांनी सांगितले की, स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी युध्दपातळीवर बचाव कार्य सुरु केले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्हॅनमध्ये हा स्फोट झाला त्यात सात ते आठ जण होते. मात्र, मृतांचा नेमका आकडा अद्याप देण्यात आलेला नाही.

जियो टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 1.52 वाजता कन्फ्युशियस इन्स्टिट्यूटजवळ एका व्हॅनमध्ये हा स्फोट झाला. ही संस्था कराची विद्यापीठातील चिनी भाषा शिकण्याची संस्था आहे.

जिओ टीव्हीच्या वृत्तानुसार, मृत चीनी नागरिकांची ओळख कन्फ्यूशियस संस्थेचे संचालक हुआंग गुइपिंग, डिंग मुपेंग आणि चेन साई अशी झाली आहे. तर त्यांचा पाकिस्तानी ड्रायव्हर खालिद अहमद याचाही या स्फोटात मृत्यू झाला आहे.

तसेच, दोन जखमींमध्ये एक चीनी नागरिक वांग युकिंग आणि दुसरा गार्ड हमीद आहे. तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याआधी गेल्या वर्षी खैबर पख्तूनख्वामध्ये बसमध्ये झालेल्या स्फोटात नऊ चिनी नागरिकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी चीन सरकारने अत्यंत कठोर भूमिका घेत पाकिस्तानच्या तत्कालीन इम्रान खान सरकारकडे जाब विचारला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT