USA Taliban first talks in Doha Afghanistan issue Dainik Gomantak
ग्लोबल

तालिबान आणि अमेरिकेत पहिल्यांदाच चर्चा

अफगाणिस्तानातून (Afghanistan) सैन्य माघार घेतल्यानंतर आणि तालिबाननेअफगाणिस्तानावर कब्जा मिळवल्यानंतर पहिल्यांदयाच अमेरिका आणि तालिबान यांच्यात चर्चा होणार आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानातून (Afghanistan) सैन्य माघार घेतल्यानंतर आणि तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानावर कब्जा मिळवल्यानंतर पहिल्यांदयाच अमेरिका (USA) आणि तालिबान यांच्यात चर्चा होणार आहे. असे सांगितले जात आहे की अमेरिकेने अफगाणिस्तान सोडू इच्छिणाऱ्या परदेशी नागरिक आणि अफगाण नागरिकांना (Afghan People) सुरक्षित बाहेर काढण्यासाठी या चर्चेचा निर्णय घेतला आहे. या अनुक्रमात शनिवार आणि रविवारी अमेरिकेचे अधिकारी तालिबानच्या वरिष्ठ प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. (USA Taliban first talks in Doha Afghanistan issue)

दोहा मध्ये होणाऱ्या या दोन देशांच्या बैठकीत अफगाणिस्तानात अमेरिकन आणि इतर परदेशी नागरिकांना अफगाणिस्तानातून सुरक्षितपणे बाहेर काढू देतील या निर्णयावर तालिबान नेत्यांना सहमती मागण्यात येणार आहे . त्यांच्यामध्ये अफगाण नागरिक देखील असतील ज्यांनी काबुलमध्ये अमेरिकन सैन्यासाठी सेवा दिली आहे. नाव न छापण्याच्या अटीवर अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली आहे.

ऑगस्टच्या अखेरीस अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेतल्यानंतर अमेरिका तालिबानशी पहिल्यांदा चर्चा करणार आहे. परराष्ट्र खात्याने एक निवेदन जारी केले असून त्यात म्हटले आहे की, शनिवारपासून अमेरिका तालिबानशी पहिली वैयक्तिक चर्चा करेल. या अनुक्रमात अमेरिकेचे शिष्टमंडळ शनिवारी आणि रविवारी कतारची राजधानी दोहा येथे तालिबानच्या वरिष्ठ प्रतिनिधींना भेटणार आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले होते की अमेरिकेला तालिबानला लवकरच किंवा नंतर तरी पण नवीन सरकारला मान्यता ही द्यावीच लागेल. अफगाणिस्तान आता तालिबानी राजवटीने चालवला जात आहे.असे वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केली आहे. तुर्कीच्या एका वृत्त संस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे विधान केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT