US troops enter Afghanistan for repatriate civilians Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिकी सैन्यअफगाणिस्तानात दाखल, नागरिकांना नेणार मायदेशी

अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबानचा ताबा झपाट्याने वाढल्याने अमेरिका आता तेथून आपल्या नागरिकांची सुटका करण्यात मग्न आहे

दैनिक गोमन्तक

तालिबानच्या (Taliban) वाढत्या व्यापात अफगाणिस्तानमधील (Afghanistan) परिस्थिती झपाट्याने बिघडत आहे. अफगाणिस्तानात तालिबानचा ताबा झपाट्याने वाढल्याने अमेरिका आता तेथून आपल्या नागरिकांची सुटका करण्यात मग्न आहे. अमेरिकेचे सैन्य (US Military)अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या आपल्या दूतावासाचे कर्मचारी आणि इतर नागरिकांना वाचवण्यासाठी राजधानी काबूलला पोहोचले आहे.तालिबानी बंडखोरांनी देशातील दुसरे आणि तिसरे मोठे शहर काबीज केल्याच्या एका दिवसानंतर, एका अमेरिकन अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की, दूतावासाचे कर्मचारी आणि इतर नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मदत करण्यासाठी अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानच्या राजधानी काबुलमध्ये पोहोचले आहे.(US troops enter Afghanistan for repatriate civilians)

मरीनच्या दोन बटालियन आणि एक पायदळ बटालियन रविवारी संध्याकाळपर्यंत काबूलला पोहोचतील, ज्यात सुमारे 3,000 सैनिकांचा समावेश असेल. अमेरिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की ते काबूलला आले आहेत आणि त्यांचे आगमन उद्यापर्यंत सुरू राहील. या भागात आणखी हजारो सैनिक तैनात करण्यात आले आहेत. अमेरिकन अधिकारी आणि कर्मचारी आणि इतर नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतरणासाठी सैन्याची तात्पुरती तैनाती हे दर्शवते की तालिबान देशाच्या मोठ्या भागावर अधिकाधिक कब्जा करत आहे.

शुक्रवारी तालिबानने अफगाणिस्तानच्या दक्षिणेकडील भागावर जवळजवळ संपूर्ण ताबा घेतला आहे जिथे तालिबानने आणखी चार प्रांतांच्या राजधानींवर ताबा मिळवला. अमेरिकन सैन्याच्या पूर्ण माघारीच्या काही आठवड्यानंतरच तालिबान आता हळूहळू काबूलच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याने कंधार, गझनीसह 10 पेक्षा जास्त प्रमुख प्रांतीय राजधानी ताब्यात घेतल्या आहेत.

ब्रिटनचे संरक्षण मंत्री बेन वालेस यांनी सांगितले की, अफगाणिस्तानातून ब्रिटिश नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सुमारे 600 सैनिक पाठवले जातील.एपी या वृत्तसंस्थेनुसार, कॅनडा काबूलमधून आपले कर्मचारी बाहेर काढण्यासाठी एक विशेष दलही पाठवणार आहे. तर ऑस्ट्रेलियाही असेच पाऊल उचलणार आहे. ऑस्ट्रेलियन सैन्याला मदत करणाऱ्या अफगाणांना बाहेर काढण्यासाठी तो अमेरिकेला मदत करेल.

अफगाणिस्तानला शेवटचा मोठा धक्का हा हेल्मंद प्रांताच्या राजधानीवर नियंत्रण गमावण्याच्या स्वरूपात आला आहे जिथे अमेरिका, ब्रिटिश आणि इतर आघाडीच्या नाटो सहयोगींनी गेल्या दोन दशकांमध्ये भीषण लढाया लढल्या आहेत. प्रांतात तालिबानचा नाश करण्याच्या प्रयत्नांमध्ये संघर्ष दरम्यान शेकडो पाश्चात्य सैनिक मारले गेले. त्याचा उद्देश केंद्र सरकार आणि अफगाणिस्तानच्या सैन्याला नियंत्रणाची उत्तम संधी देण्याचा होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT