Joe Biden Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन रशियावरील निर्बंध करणार जाहीर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) लवकरच रशियाकडून तेल आयातीवर बंदी घालण्याची घोषणा करणार आहेत.

दैनिक गोमन्तक

युक्रेनवर हल्ला झाल्यापासून अमेरिका रशियाविरुध्द कठोर भूमिका घेत आहे. यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन लवकरच रशियाकडून होत असलेल्या तेल आयातीवर बंदी घालण्याची घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. युक्रेनवरील (Ukraine) रशियन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून बायडन मंगळवारी या बंदीची घोषणा करु शकतात, असे अमेरिकन मीडियाने म्हटले आहे. व्हाईट हाऊसने म्हटले आहे की, 'युक्रेनवर युध्द लादल्यामुळे बायडन प्रशासन रशियावर (Russia) कारवाई करणार आहे. बायडन प्रशासनावर रशियाविरोधात कारवाई करण्यासाठी अमेरिकेच्या खासदारांकडून दबाव वाढत आहे.'

दरम्यान, युक्रेनवरील रशियाचा हल्ला हा केवळ हल्ला नसून युरोप आणि जागतिक शांततेवरील हल्ला असल्याचे बायडन यांनी नुकतेच म्हटले आहे. बायडन यांनी शुक्रवारी फिनलंडच्या राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, 'दोन्ही देश सातत्याने संपर्कात आहेत. युक्रेन विरुद्ध बेकायदेशीर आणि प्रक्षोभित आक्रमणाला रशिया जबाबदार आहे.'

तसेच, रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर कच्च्या तेलाच्या आयात-निर्यातीवर लक्षणीय परिणाम झाला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं (America) रशियातून होणाऱ्या इंधन आयातीवर निर्बंध घालण्याची तयारी सुरु केलीये. याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, रशियाची आक्रमक भूमिका पाहता अमेरिकन संसद सदस्यांनी Russian Energy Imports Act आणला आहे. या अंतर्गत रशियातून आयात करण्यात येणारे कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीवर बंदी घालण्याची तरतूद करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT