Joe Biden Dainik Gomantak
ग्लोबल

महागाईच्या प्रश्नावर अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन भडकले, पत्रकाराला केली शिवीगाळ

हा शब्द त्यांनी सौम्यपणे वापरला असला तरी मायक्रोफोन लावल्यामुळे तो कॅमेऱ्यात कैद झाला.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन सोमवारी थेट मायक्रोफोनवर एका पक पत्रकाराविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरताना आढळले. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. खरं तर, काल व्हाईट हाऊसच्या फोटो सत्राच्या बाजूला, राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (Joe Biden) यांनी एका न्यूजच्या पत्रकाराला थेट मायक्रोफोनवर 'सन ऑफ बिच' म्हटले. हा शब्द त्यांनी सौम्यपणे वापरला असला तरी मायक्रोफोन लावल्यामुळे तो कॅमेऱ्यात कैद झाला. (Joe Biden Latest News)

खरे तर हे रेकॉर्डिंग तेव्हा केले आहे जेव्हा न्यूजच्या एका पत्रकाराने फोटो सेशननंतर राष्ट्रपतींना विचारले की वाढती महागाई हे राजकीय बंधन आहे का? त्याच वेळी, या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर, बायडेन बहुधा मायक्रोफोन चालू असल्याचे विसरले आणि त्यांनी पत्रकाराला 'सन ऑफ बिच' असे अपशब्द वापरून हळूवारपणे म्हटले. त्यावेळी कॅमेरा सांभाळत असलेल्या पूल रिपोर्टरचे म्हणणे आहे की, हॉलमध्ये खूप गोंगाट असल्याने त्यांना त्यावेळी ते ऐकू आले नाही पण नंतर ते ऐकले.

यूजर्सने जोरदार ट्रोल केले

त्याचवेळी बिडेन यांच्या पत्रकाराप्रती द्वेषपूर्ण भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर अनेक युजर्स आपली प्रतिक्रिया देत आहेत. आपण अनेकदा लोकांच्या पाठीमागे जे बोलतो ते बोलण्याची हिंमत राष्ट्रपतींमध्ये आहे, असे एका युजरने गमतीशीरपणे म्हटले आहे. त्याचवेळी आणखी एका युजरने राष्ट्रपतींच्या या भाषेवर टीका करत अशी अपशब्द देशाच्या राष्ट्रपतींना शोभत नसल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT