Dolphin  Dainik Gomantak
ग्लोबल

US Navy: अमेरिकेच्या नौसेनेने डॉल्फीनवर लावले कॅमेरे; व्हिडिओ पाहून थक्क झाले वैज्ञानिक

US Navy: जवळजवळ 6 महिने हा कॅमेरा डॉल्फीनवर लावण्यात आला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

US Navy: बदलत्या तंत्रज्ञानामुळे आज आपण अनेक गोष्टी अगदी सहजरित्या पाहू शकतो, ऐकू शकतो आणि अनेक गोष्टींचा शोध घेऊ शकतो. आता अमेरिकेच्या नौसेनेने डॉल्फीनवर कॅमेरे लावून डॉल्फीनच्या जीवनशैलीचा, सवयींचा आणि खाद्य मिळवण्याच्या पद्धतीचा अभ्यास केला आहे. जवळजवळ 6 महिने हा कॅमेरा डॉल्फीनवर लावण्यात आला होता.

डॉल्फीन हा एक लोकप्रिय आणि सामाजिक प्राणी आहे. मात्र त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी आपल्याला माहीत नसतात. आपल्यापैकी अनेकांना डॉल्फीनच्या खाण्याचे दोन प्रकार माहीत आहेत.आता त्यांच्याबद्दल जास्त माहीती मिळवण्यासाठी यूएस नॅशनल मरीन मॅमल फाउंडेशनने 6 बॉटलनोज डॉल्फीनवर कॅमेरे लावले होते.

या डॉल्फीनला पाण्याखालील माइन्स ओळखण्याचे आणि काही परमाणू भांडाराचे संरक्षण करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्यावर लावलेल्या या कॅमेऱ्याद्वारे फुटेज आणि ऑडीओ रेकॉर्ड केले आहेत. ज्याद्वारे डॉल्फीनच्या रणनीती आणि खाण्याच्या पद्धती समजून घेण्यास मदत झाली आहे.

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, डॉल्फीन अन्नाच्या शोधात व्हिजन आणि साऊंड दोन्हीचा वापर करतात. यामध्ये दिसलेल्या दृश्यानुसार, मोठ्या प्रमाणात डॉल्फीन माश्यांना किनाऱ्यावरच पकडतात. याआधी डॉल्फीनला सापांबरोबर भांडताना पाहिले असेल मात्र या रेकॉर्डिंगमध्ये डॉल्फीन साप खाऊही शकतात असेही म्हटले आहे. एका डॉल्फीनने 8 पिवळ्या विषारी सापांना खाल्ले असल्याचे दिसून आले आहे.

NMMF की एथोलॉजिस्ट ब्रिटनी जोन्सच्या म्हणण्यानुसार, डॉल्फीनचा व्यवहार, शरीर रचना, आरोग्य आणि संचार चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी नेवी डॉल्फ़िनसोबत काम करण्यासाठी त्यांचा रचनात्मक दृष्टिकोण भविष्यातील वैज्ञांनिकांना अभ्यास करण्यात प्रेरणा देईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT