Elon Musk  Dainik Gomantak
ग्लोबल

Elon Musk Tweet Viral: युपी पोलिसांचे एलन मस्कच्या ट्विटला भन्नाट रिप्लाय, सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल

UP Police Tweet Viral: युपी पोलिसांनी मस्क यांच्या ट्विटला रिट्विट केल्याने चांगलेच व्हायरल झाले आहे.

दैनिक गोमन्तक

जगातील श्रीमंत व्यक्ती, टेस्ला आणि आता ट्विटरचे मालक एलन मस्क सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. मस्क काही ना काही ट्विट करत असतात. या ट्विटवर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत असतात. त्यावर मस्कही पुन्ही रिट्विट करतात. मस्क यांचे अनेक ट्विट यांमुळे चर्चेत असतात. सध्या मस्क यांचे एक ट्विट (Tweet) आणि त्यावरील युपी पोलिसांचं ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. युपी पोलिसांनी (UP Police) एलॉन मस्क यांच्या ट्विटला भन्नाट रिट्विट केले आहे. यामुळे चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.

  • युपी पोलिसांचे एलन मस्क यांना भन्नाट रिप्लाय

एलन मस्क यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये एलन मस्क यांनी लिहिले होते की, 'मी ट्विट केल्यावर माझ्या ट्विटची गिनती माझ्या कामामध्ये केली जाते का?' या ट्विटवर युपी पोलिसांनी त्यांच्या अंदाजात केलेलं ट्विट सध्या चर्चेत आहे.

मस्क यांच्या ट्विटवर युपी पोलिसांनी ट्विट करत म्हटलं की, 'जर युपी पोलिसांनी तुमची तक्रार ट्विटवर सोडवली, तर हे काम मानलं जाईल का?' यानंतर युपी पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून या ट्विटचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. त्यावर 'होय, हे काम मानलं जाईल.', असंही लिहिले आहे. त्यामुळे युपी पोलिसांचं हे ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे.

  • ट्विटरवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा वर्षाव

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि ट्विटरचे मालक एलन मस्क सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय असतात. ते त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून काही ना काही ट्विट करत असतात. असंच एक ट्विट मस्क यांनी केले होते. यामध्ये त्यांनी विचारलं की, 'मी ट्विट केल्यावर ते माझं काम समजलं जातं का?' या ट्विटवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT