Michelle Bachelet Dainik Gomantak
ग्लोबल

UN ह्यूमन राइट चीफचा मोठा खुलासा, तालिबानच्या 'क्रूरतेचा' चेहरा समोर

ज्यात नागरिकांना आणि सशस्त्र सुरक्षा कर्मचाऱ्यांना तात्काळ मृत्यूदंड आणि महिलांवर बंदी समाविष्ट आहे.

दैनिक गोमन्तक

संयुक्त राष्ट्राच्या (UN) मानवाधिकार प्रमुख मिशेल बॅचेलेट (Michelle Bachelet) यांनी तालिबानबद्दल मोठा खुलासा केला आहे. मिशेल बॅचेलेट म्हणाल्या की, अफगाणिस्तानातील (Afghanistan) तालिबान-नियंत्रित (Taliban) भागात क्रूरतेच्या बातम्यांची "पुष्टी" झाली आहे, ज्यात नागरिकांना आणि सशस्त्र सुरक्षा कर्मचाऱ्यांना तात्काळ मृत्यूदंड आणि महिलांवर बंदी समाविष्ट आहे.

अफगाणिस्तानमधील लोकांच्या हक्कांशी संबंधित परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मानवाधिकार परिषदेने "धाडसी आणि ठोस कारवाई" करण्याचे आवाहन केले. मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या अहवालांची चौकशी करण्यासाठी कठोर कारवाई केली पाहिजे आणि युद्धग्रस्त देशावर आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वाया जाऊ नये, असे बॅचेलेट म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, “या नाजूक क्षणी, अफगाणिस्तानचे लोक त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी मानवाधिकार परिषदेकडे (human rights council) पाहत आहेत.

मुलींना शाळेत जाण्यास बंदी

अफगाणिस्तानमधील मानवाधिकारांच्या परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा स्थापन करून मी कौन्सिलला धाडसी आणि ठोस कारवाई करण्याचे आवाहन करते, असे बॅचेलेट यावेळी म्हणाल्या. त्याच वेळी, ते म्हणाल्या की अफगाणिस्तानमधील तालिबान नागरिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना ताबडतोब फाशी देण्याचे काम करत आहे मात्र ज्यांनी शस्त्रे खाली ठेवली आहेत त्यांना शरण येण्यास सांगितले जात आहे. महिलांना मुक्तपणे फिरण्यास आणि मुलींना शाळेत जाण्यास बंदी घातली आहे आणि शांततेने निदर्शने करणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न तालिबान्यांनकडून करण्यात येत आहे.

भीतीमुळे अफगाण लपले

संयुक्त राष्ट्रांना माहिती पुरवणाऱ्या एका नॉर्वेजियन खाजगी गुप्तचर संस्थेने काही दिवसांपूर्वी सांगितले की, तालिबानने पूर्व अफगाणिस्तान सरकार आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सैन्यासाठी काम केलेल्या लोकांना काळ्या यादीत टाकले होते. अनेक अफगाणी भीतीमुळे लपून बसले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेचे एक विशेष सत्र तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यानंतर मानवी हक्कांच्या चिंता आणि अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT