President of Ukraine President Zelensky Dainik Gomantak
ग्लोबल

...तर आम्ही हे युद्ध खूप आधीच संपवले असते: राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की

जर्मन चांसलरने युक्रेनला शस्त्र पुरवठा सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आणखी भीषण स्वरूप धारण करत असल्याचे दिसून येत आहे. रशियन सैन्याने युक्रेनच्या शहरांवर बॉम्ब आणि क्षेपणास्त्र हल्ले तीव्र केले आहेत. त्याचवेळी, कीवचे प्रादेशिक पोलिस प्रमुख आंद्रे नेबिटोव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार रशियन हल्ल्यात या भागातील एक हजाराहून अधिक नागरिक मारले गेले आहेत. या सगळ्यामध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पुन्हा शस्त्रांची मागणी केली आहे. (Ukrainian army needs more weapons)

झेलेन्स्की म्हणाले की जर आमच्याकडे आवश्यक असलेली शस्त्रे असती तर आम्ही हे युद्ध खूप आधी संपवले असते. रशियन सैन्य इतिहासातील सर्वात रानटी आणि अमानवी सैन्य म्हणून या युद्धात स्वतःची नोंदणी करेल.

जर्मन चांसलरने युक्रेनला शस्त्र पुरवठा सुरू ठेवण्याची घोषणा केली आणि असेही सांगितले की जर्मनीची (Germany) शस्त्रास्त्र पुरवठा क्षमता आता जवळजवळ संपली आहे. युक्रेन युद्धात नाटो थेट हस्तक्षेप करणार नाही, असेही जर्मन चान्सलरने स्पष्ट केले.

लुहान्स्कमध्ये भीषण लढाई सुरू
लुहान्स्कमध्ये रशिया (Russia) आणि युक्रेन यांच्यातील भीषण संघर्ष सुरू आहे. लुहान्स्क ओब्लास्टच्या गव्हर्नरने सांगितले की, सतत गोळीबार सुरू असताना नागरिकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. रशियाने नुकतेच क्रेमिना शहरही ताब्यात घेतले होते. आता या शहरातून लोकांना बाहेर काढण्याची मोहीम ठप्प झाली आहे.

युक्रेनने मारिन्का शहराचा ताबा घेतल्याचा दावा
युक्रेनने (Ukraine) दावा केला आहे की सैन्याने डोनेस्तकपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या मरिन्का शहरावर पुन्हा ताबा मिळवला आहे. मार्चच्या मध्यात रशियन सैन्याने मारिन्कावर नियंत्रण प्रस्थापित केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: 6 बाद 84 वरुन गोव्याचे शानदार कमबॅक! दर्शन-यशची शतकी भागीदारी; पहिल्या दिवसाअखेर संघाने ओलांडला द्विशतकाचा टप्पा

Viral Video: चहा विकून महिन्याला 9 लाखांची बक्कळ कमाई! चहावाल्यानं सांगितलं यशाचं गमक; म्हणाला, 'PM मोदींच्या संघर्षातून घेतली प्रेरणा...'

Asgaon Water Crisis: आसगाव ग्रामसभेत पाणीटंचाईचा मुद्दा गाजला; बहुमजली प्रकल्पांना विरोध करत ग्रामस्थांचा एल्गार, अपुऱ्या पावसामुळे पाण्याचे दुर्भीक्ष

Colvale Central Jail: पाणीटंचाई, तुटलेली गटारे आणि डासांचा प्रादुर्भाव, कोलवाळ कारागृहात मानवाधिकार आयोगाची अचानक धडक; कैद्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Scrub Typhus Spread In goa: गोव्यात 'स्क्रब टायफस'चा धोका वाढला! 827 जण बाधित; तिसवाडी, मुरगावात सर्वाधिक रुग्ण

SCROLL FOR NEXT