Vladimir Putin Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: रशियाला मोठा झटका, युक्रेनने पाडले सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्र!

Russia-Ukraine War: या आठवड्यात राजधानी कीववर झालेल्या हल्ल्यादरम्यान युक्रेनच्या हवाई दलाने पहिल्यांदाच रशियन हायपरसॉनिक क्षेपणास्त्र पाडले.

Manish Jadhav

Russia-Ukraine War: रशियासोबत सुरु असलेल्या युद्धात युक्रेनला मोठे यश मिळाले आहे. या आठवड्यात राजधानी कीववर झालेल्या हल्ल्यादरम्यान युक्रेनच्या हवाई दलाने पहिल्यांदाच रशियन हायपरसॉनिक क्षेपणास्त्र पाडले.

युक्रेनच्या हवाई दलाने शनिवारी ही माहिती दिली. रशियासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. रशिया लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करुन युक्रेनवर हवाई हल्ले करत आहे.

दरम्यान, 5 वर्षांपूर्वी 2018 मध्ये रशियाने अत्यंत धोकादायक क्षेपणास्त्र तयार केले होते. पुतिन यांनी त्याचे नाव 'किंजल' असे ठेवले होते. किंजलचा अर्थ खंजीर असा होतो.

किंजल हे 2018 मध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अनावरण केलेल्या सहा "नेक्स्ट जनरेशन" शस्त्रांपैकी एक आहे. पुतिन यांनी त्यावेळी दावा केला होता की, हे क्षेपणास्त्र (Missile) जगातील कोणतीही हवाई संरक्षण यंत्रणा पाडू शकत नाही.

आता, युक्रेनने ते पाडल्याचा दावा केला आहे. युक्रेनियन वायुसेनेचे कमांडर मायकोला ओलेशचुक यांनी सांगितले की, Kh-47 किंजल हे विमान गुरुवारी रात्री कीवच्या बाहेरील भागात पाडण्यात आले. अमेरिकेच्या पॅट्रियट एअर डिफेन्स सिस्टीमने ते पाडले असल्याचे हवाई दलाने म्हटले आहे.

दुसरीकडे, अमेरिकन पॅट्रियट प्रणाली जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्रांपैकी एक मानली जाते. रशियापासून बचाव करण्यासाठी युक्रेनला पाश्चात्य देशांनी पुरवलेल्या शस्त्रास्त्रांपैकी पॅट्रियट क्षेपणास्त्र प्रणाली आहे. पॅट्रियट प्रणाली रशियन हल्ल्यांना रोखण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी कार्यरत आहे.

त्याचबरोबर, रशियाने आपल्या किंजल क्षेपणास्त्राबाबत युक्रेनच्या (Ukraine) दाव्यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र या क्षेपणास्त्राला पाश्चिमात्य देशांना तोड नसल्याचा दावा रशिया करत आहे.

हवेतून मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राचा वेग 10 Mach (12,350 किमी प्रति तास) पर्यंत असू शकतो. हे अण्वस्त्र वा पारंपारिक शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. त्याची श्रेणी 1,500 ते 2,000 किमी आहे.

शिवाय, एक वर्षाहून अधिक काळ चाललेल्या युद्धात रशियाने केलेल्या हल्ल्यांमध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

रशियन क्षेपणास्त्रांनी युक्रेनमधील वीज प्रकल्पांनाही लक्ष्य केले आहे. पॉवर ग्रीडचे नुकसान झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित झाला आहे. तर दुसरीकडे, नागरिकांना लक्ष्य केल्याचे रशियाने नाकारले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT