Volodymyr Zelenskyy Dainik Gomantak
ग्लोबल

युक्रेनमध्ये देशव्यापी आणीबाणी जाहीर

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना त्यांच्या देशाबाहेर लष्करी शक्ती वापरण्याचा अधिकार दिल्यानंतर युक्रेनने बुधवारी देशव्यापी आणीबाणी घोषित केली आहे.

दैनिक गोमन्तक

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना त्यांच्या देशाबाहेर लष्करी शक्ती वापरण्याचा अधिकार दिल्यानंतर युक्रेनने बुधवारी देशव्यापी आणीबाणी घोषित केली आहे. (Ukraine declares state of emergency) दरम्यान, पाश्चात्य देशांनी रशियाविरुद्ध अनेक निर्बंधांची घोषणा केली आणि मॉस्कोने युक्रेनमधील आपल्या दूतावासाचा परिसर रिकामा केला आणि राजनैतिक कर्मचाऱ्यांना बाहेर काढले आहे. युक्रेनच्या खासदारांनी राष्ट्रव्यापी आणीबाणी लागू करण्याच्या राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्कीच्या (Volodymyr Zelenskyy) आदेशाला मान्यता दिली आहे, जी गुरुवारपासून 30 दिवसांसाठी लागू होणार आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (United Nations Security Council) युक्रेनवर (Ukraine) आपत्कालीन सत्र आयोजित करणार आहे. युक्रेनवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची या आठवड्यात ही दुसरी वेळ असेल.

एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले आहे की, जर एखाद्या हल्ल्याचे आदेश दिले गेले तर, युक्रेनच्या सीमेजवळ तैनात असलेल्या रशियन सैन्याने त्यासाठी पूर्ण तयारी केली. या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे की, 80 टक्के सैन्य "सुसज्ज" आहे आणि सीमेपासून पाच ते 50 किमीच्या परिघात तैनात करण्यात आला आहे. "रशियन सैन्याने डॉनबास युक्रेनमधील बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या भागात प्रवेश केला आहे की नाही याची आम्ही अद्याप पुष्टी करू शकत नाही असे ते यावेळी म्हणाले.

संयुक्त राष्ट्रातील रशियाच्या राजदूताने जगातील देशांना युक्रेनच्या पूर्वेकडील फुटीरतावादी प्रदेशांमध्ये युक्रेनचा सतत हिंसाचार आणि घोर नरसंहार थांबविण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे. युक्रेनच्या पूर्वेकडील भागात शांतता भंग करणार्‍यांना उदारता दाखवण्याचा कोणताही हेतू नसावा, असे संयुक्त राष्ट्रातील रशियाचे राजदूत वॅसिली नेबेन्झिया यांनी बुधवारी संयुक्त राष्ट्र महासभेत सांगितले आहे. ते म्हणाले की लुहान्स्क आणि डोनेस्तक येथून हजारो लोकांचे रशियामध्ये आगमन हे दर्शवते की युक्रेन त्यांच्याशी अनादर करत आहे.

आपला दूतावास रिकामा केला आहे. त्याचबरोबर युक्रेननेही आपल्या नागरिकांना रशिया सोडण्याचे आवाहन केले. मॉस्कोचे कीवमध्ये दूतावास आणि खार्किव, ओडेसा आणि ल्विव्हमध्ये वाणिज्य दूतावास आहेत. रशियाने (Russia) युक्रेनमधील आपले राजनैतिक प्रतिष्ठान रिकामे केले असल्याचे माध्यमांमध्ये सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रीडा विश्वात मोठी खळबळ! भारतीय खेळाडूकडून हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ, पोलिसांकडून कारवाई

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

Royal Enfield Upcoming Bikes: 'रॉयल एनफील्ड' आणणार 5 नव्या बाइक्स, 750cc सेगमेंटपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत अनेक पर्याय मिळणार

October Heat: 'ऑक्टोबर हिट'मध्ये रुग्णवाहिका बंद पडली; मदतीला धावले अनोळखी हात, पण अधिकारी उभा राहिला बाजूला!

Waste Management: गोव्यात दररोज 3,824 किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया; आकडेवारी आली समोर

SCROLL FOR NEXT