Farhan Saeed Dainik Gomantak
ग्लोबल

Turkey-Syria Earthquake: तुर्कीचे कलाकार धावले भूकंपग्रस्तांच्या मदतीला; नेटकरी का भडकले पाकिस्तानी कलाकारांवर ?

Turkey-Syria Earthquake: मिळालेल्या माहितीनुसार, आजही भूकंपाच्या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

Turkey-Syria Earthquake: तुर्की -सिरीयामध्ये आलेल्या भूकंपाने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. या भूकंपात 45000 हजारांहून जास्त लोक मृत्यूमुखी पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आजही भूकंपाच्या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.

जगभरातून तुर्की आणि सीरीयाला मदत केली जात आहे. तुर्कीतील मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज लोकही फंड गोळा करुन भूकंपग्रस्ताना मदत करत आहेत. सोशल मिडियावर तुर्कीच्या अभिनय क्षेत्रातील दिग्गज करत असलेल्या कामाचे कौतुक होत आहे.

मात्र याचवेळी पाकिस्तानच्या कलाकारांवर टीका केली जात आहे. पाकिस्तानमध्ये जेव्हा पूर आला होता तेव्हा पाकिस्तानी कलाकार कोणतीही मदत न करता अवॉर्ड फंक्शनसाठी रवाना झाले होते.

पाकिस्तानी कलाकार आपल्या देशाच्या वाईट काळात देशाबरोबर उभे राहू शकत नाहीत ,कोणतीही मदत करु शकत नाही. अशा लोकांसोबत आणखी वाईट व्हायला हवे असे सोशल मिडियावर म्हटले जात आहे.

यावर आता पाकिस्तानी कलाकार फरहान सईद याने उत्तर दिले आहे. पाकिस्ताना( Pakistan )त जेव्हा पूर आला होता तेव्हा पूरग्रस्तांसाठी फंड गोळा केला होता. पाकिस्तानी कलाकार असे अवॉर्ड सोहळे फंड गोळा करण्यासाठीच करतात.

कलाकारांनी दवाखान्यासाठी मोठा फंड गोळा केला होता. तुमच्यासारख्या लोकांना नेहमी दुसऱ्यांच्याच गोष्टी चांगल्या वाटतात. असे म्हणत फरहान सईदने आपली बाजू मांडली आहे.

दरम्यान, फरहानचे हे उत्तर नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले नाही. तुम्ही कलाकारांनी जेवढे पैसे कार्यक्रम करण्यात, हॉटेलमध्ये थांबण्यात आणि प्रवास करण्यासाठी घालवले त्यापेक्षा जास्त तुम्ही फंड गोळा केला असू शकत नाही. आपल्या देशासोबत कसे राहतात हे तुर्की (Turkey )च्या कलाकारंकडून शिका असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT