Afghanistan Dainik Gomantak
ग्लोबल

Afghanistan: TTP कंमाडर उमर खालिद खोरासानीसह 4 दहशतवादी ठार

Tehreek-e-Taliban Pakistan: तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा (TTP) प्रमुख कमांडर उमर खालिद खोरासानी आणि इतर तीन प्रमुख दहशतवादी एका स्फोटात ठार झाले.

दैनिक गोमन्तक

Afghanistan News: पूर्व अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतात बंदी घातलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा (TTP) प्रमुख कमांडर उमर खालिद खोरासानी आणि इतर तीन प्रमुख दहशतवादी एका स्फोटात ठार झाले. सोमवारी पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीत ही माहिती देण्यात आली.

दरम्यान, एक्सप्रेस ट्रिब्यून वृत्तपत्राने वृत्त दिले आहे की, अफगाण अधिकारी आणि स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खोरासानीसह दहशतवादी (Terrorist) संघटनेच्या वरिष्ठ कमांडरांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला रविवारी लक्ष्य करण्यात आले.

दुसरीकडे, शीर्ष अतिरेकी पक्तिका प्रांतातील बिरमल जिल्ह्यात एका बैठकीसाठी जात असताना त्यांच्या वाहनाला भूसुरुंगाने उडवून दिले. वृत्तपत्राने एका वरिष्ठ अफगाण अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, वाहनातील सर्व जण या स्फोटात ठार झाले आहेत. यामध्ये अब्दुल वली मोहमंद, मुफ्ती हसन आणि हाफीज दौलत खान या TTP कमांडरचा समावेश आहे, असे पेपरने म्हटले आहे.

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीसाठी जात असताना रविवारी TTP नेत्यांचे वाहन भूसुरुंगाखाली आले. टीटीपी या दहशतवादी संघटनेला संपूर्ण पाकिस्तानात (Pakistan) शरिया कायदा लागू करायचा आहे. खोरासानी यांच्यावर एक कोटी रुपयांचे बक्षीस होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

SCROLL FOR NEXT