INDIA 3.jpg
INDIA 3.jpg 
ग्लोबल

भारत आणि थायलंड यांच्यात तीन दिवसीय संयुक्त गस्त मोहीम

गोमंन्तक वृत्तसेवा

अंदमान सागरामध्ये (Andaman Sea) बुधवारी भारत (India) आणि थायलंड(Thailand) नौदलाने (Navy) तीन दिवसांची संयुक्त गस्त मोहीम सुरु केली आहे. दुसरीकडे हिंदी महासागरामध्ये(Indian Ocean) चीनने (China) सागरी अस्तित्व वाढवल्याने दोन्ही देशांनी ही मोहीम हाती घेतली आहे.

भारतीय नौदलाची(Indian Navy) 'आयएनएस शरयू' (INS Sharu) 'आणि थायलंडचे 'कॅब्री' (Cabri) हे जहाजे या मोहिमेमध्ये सहभागी असून दोन्ही नौदलांनी डार्नियर गस्त विमानांचाही (Darnier aircraft) वापर या मोहीमेमध्ये करण्यात आला आहे. आत्तापर्यंतची भारत आणि थायलंड यांच्यातील 31 वी संयुक्त गस्त मोहीम असून दोन्ही देशांची नौदले दर दोन वर्षांनी संयुक्त कवायती करीत असतात. या कवायतींचा प्रस्ताव 2005 पासून मांडला गेला नंतर त्याची अंमलबजावणी करण्यात आली. हिंदी महासागमध्ये सुरु असलेल्या कवायती हा त्याचाच भाग असल्याचे भारतीय नौदलाचे कमांडर विवेक मधवाल (Vivek Madhawal) यांनी सांगितले आहे. (A three day joint patrol between India and Thailand)

दोन्ही देशांच्या नौदलादरम्यान 'कोरपॅट' (Corpat) नावाने या कवायती प्रसिध्द आहेत. सागरी क्षेत्रातील अमली पदार्थ, अवैध मासेमारी, सागरी दहशतवाद, सशस्त्र दरोडे आणि चाचेगिरी आटोक्यात आणण्यासाठी त्याची गरज असते, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. या कवायतीमुळे दोन्ही देशांमध्ये माहीतीचे देवाणघेवाण होते. तस्करी रोखण्यासाठी हे अगदी महत्त्वाचे आहे. तसेच अवैध स्थलांतरालाही आळा बसतो. या कवायतींमध्ये हिंदी महासागरातील प्रादेशिक सागरी संरक्षण हे महत्त्वाचे आहे.

भारत आणि थायलंड यांच्यात 31 व्या कोरपॅट कवायती होत असून थायलंड नौदलाशी सहकार्य वाढणार आहे, असे मधवाल यांनी सांगितले आहे. हिंदी महासागरात भारतीय नौदल काही वर्षात अस्तित्व वाढवत असून कोरोना महामारीमुळे त्यामध्ये अडथळे येऊ न देता मागील महिन्यात अनेक देशांबरोबर नौदल सराव करण्यात आले आहेत.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT