Sergey Brin Dainik Gomantak
ग्लोबल

जगातील सहाव्या सर्वात श्रीमंत व्यक्तीने घटस्फोटासाठी ठोठावले कोर्टाचे दार

गुगलचे सहसंस्थापक आणि जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती सर्गे ब्रिन यांनी आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.

दैनिक गोमन्तक

Sergey Brin Divorce: गुगलचे सहसंस्थापक आणि जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती सर्गे ब्रिन यांनी आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. अलीकडच्या काळात पत्नीला घटस्फोट देणारे ते तिसरे अब्जाधीश बनले आहेत. (the worlds sixth richest man sergey brin knocked on the courts door pleaded for divorce)

घटस्फोट का होत आहे?

कोर्टात दाखल केलेल्या अर्जात ब्रिन यांनी दोघांमधील भांडणांचा उल्लेख केला आहे. या दाम्पत्याला तीन वर्षांचा मुलगा आहे. मात्र, त्यांनी घटस्फोटाची (Divorce) कारणे गोपनीय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रिन 94 अब्ज डॉलर्सच्या मालमत्तेचे मालक आहेत

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, 48 वर्षीय ब्रिन यांची एकूण संपत्ती $94 अब्ज आहे. लॅरी पेज आणि ब्रिन यांनी 1998 मध्ये अल्फाबेटची स्थापना केली होती. त्यानंतर दोघांनी 2019 मध्ये अल्फाबेट कंपनी सोडली.

अब्जाधीशांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सामान्य झाली आहे

काही काळापूर्वी बिल गेट्स (Bill Gates) आणि मेलिंडा फ्रेंच गेट्स यांनीही घटस्फोटाची घोषणा केली होती. याशिवाय जेफ बेझोस आणि मॅकेन्झी स्कॉट यांचाही तीन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT