Taliban women  Dainik Gomantak
ग्लोबल

तालिबानने महिलांवरील निर्बंध वाढवले

महिलांचे चेहरे झाकले नसल्यास कठोर कारवाईचा दिला इशारा

दैनिक गोमन्तक

तालिबानी राजवटीत महिलांनी काय पेहराव करावा सार्वजनिक ठिकाणी काय पेहराव करु नये, या संदर्भात अनेक वेळा निर्बंध लादणारे फतवे काढले आहेत. यात आता पुन्हा भर पडली असून तालिबान पुरस्कृत मंत्रालयाने या संदर्भात अफगाणच्या अनेक ठिकाणी पोस्टर लावली आहेत. (The Taliban increased restrictions on women )

पोस्टर लावताना तालिबानी धार्मिक पोलिसांनी कंदाहार शहरात हिजाब न घालणाऱ्या महिलांचे पोस्टर लावले आहेत. यामध्ये हिजाब न घालणाऱ्या मुस्लिम महिलांची तुलना प्राण्यांशी करण्यात आली आहे. कंदहारमधील अनेक कॅफे आणि दुकानांवर मंत्रालयाने जाहिरातींचे पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टर्सवर बुरख्याची छायाचित्रे असून हिजाब न घालणाऱ्या मुस्लिम महिला प्राण्यांसारखे दिसण्याचा प्रयत्न करत असल्याचे लिहिले आहे.

लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये असा मजकूर आहे की, लहान, घट्ट आणि पारदर्शक कपडे परिधान करणे देखील अखुंदजादाच्या आदेशाच्या विरोधात आहे. मंत्रालयाचे प्रमुख अब्दुल रहमान तयबी यांनी सांगितले की, त्यांनी हे पोस्टर्स लावले आहेत आणि ज्या महिलांचे चेहरे झाकलेले नाहीत, आम्ही त्यांच्या कुटुंबीयांना कळवू आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करू.

महिलांवर निर्बंध लादणारे फतवे काढणे तालिबानकडून कायम

ऑगस्टमध्ये सत्तेत परत आल्यापासून तालिबानने अफगाण महिलांवर कठोर निर्बंध लादले आहेत. गेल्या मार्चमध्येही तालिबानने एक आदेश जारी करून स्त्री आणि पुरुषांना एकाच दिवशी मनोरंजन उद्यानात जाण्यास बंदी घातली होती. याआधीही तालिबान राजवटीने महिलांवर अनेक निर्बंध लादले आहेत. यामध्ये एकट्याने प्रवास करण्यावर बंदी, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी पुरुषाला सोबत घेण्याची गरज, महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स देण्यावर बंदी, हिजाब परिधान करणे सक्तीचे, दुकानांबाहेर महिलांचे फोटो असलेले फलक काढणे आदींचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI: गुवाहाटीत महापराक्रम! 55 वर्षांच्या वनडे क्रिकेट इतिहासात कधीही घडलं नाही, ते घडलं; भारत-वेस्टइंडीज सामना ठरला क्रिकेट विश्वातील 'सुवर्णपान'

Goa Politics: 2 ऑक्टोबरला वीरेश बोरकरांची मोठी घोषणा; मनोज परबांच्या 'आरजी' प्रवेशाच्या चर्चांदरम्यान विशेष मुलाखतीत भूमिका स्पष्ट

Porsche Cayenne Electric भारतात लॉन्च! 2.5 सेकंदात 100 kmph, 642 किमी रेंज; जाणून घ्या किंमत आणि खास फीचर्स

ST Reservation: 'एसटी' राजकीय आरक्षणासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न; निवडणुकीपूर्वी प्रक्रिया पूर्ण होईल, रमेश तवडकरांचा विश्वास

IND vs WI: शुभमन गिलचं द्विशतक, रोहित शर्माची शतकी खेळी अन् भारताचा दणदणीत विजय; तरीही गौतम गंभीर खूश नाही, कारण काय?

SCROLL FOR NEXT