Taliban Dainik Gomantak
ग्लोबल

तालिबानने काश्मीर मुद्यावर स्पष्ट केली भूमिका

तालिबान (Taliban) काश्मीर मुद्याला दोन भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतर्गत मुद्दा मानते.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानमधून (Afghanistan) अमेरिकी सैन्यांनी माघार घेतल्यानंतर तालिबानने अफगाण सरकार (Afghan government) उलथवून टाकले. त्यातच आता तालिबानने काश्मीर मुद्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तालिबान काश्मीर मुद्याला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतर्गत मुद्दा मानते. मात्र आमचे काश्मीरवर मुद्यावर लक्ष आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील सुरक्षेेत वाढ करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सध्या काश्मीर खोऱ्यामध्ये आलबेल आहे. येत्या काळात अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार स्थापन झाल्यानंतर ते कसे असेल याकडे भारत सरकारचे लक्ष आहे. तालिबानचे अन्य देशातील लोकशाही शासनावर लक्ष असून त्याबद्दल तालिबानची भूमिका काय असेल याकडेही भारताचे लक्ष आहे. अफगाणिस्तान इस्लामिक दहशतवादाचे पहिले केंद्र बनू शकेल अशी चिंता आहे.इतिहासाची पुनरावृत्ती! अमेरिकी सैन्याचा सायगॉननंतर आता काबूलमधून पळ

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा तालिबानवर प्रभाव आहे. तथापि, तालिबानने ताकदीच्या जोरावर अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळवली आहे. आयएसआय केवळ कमकुवत तालिबानवर परिणाम करु शकते, परंतु सध्याच्या परिस्थितीत ते अशक्य वाटते.

'जम्मू -काश्मीरला काळजी घ्यावी लागेल'

सूत्रांनी सांगितले की, पूर्वी अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानी संघटनांची छावणी होती, त्यामुळे आपल्याला जम्मू -काश्मीरमध्ये सावध राहावे लागेल. ते म्हणाले की, पाकिस्तान तालिबान्यांना काश्मीरविरोधात भडकवण्याचा प्रयत्न करेल. म्हणूनच भारताने सतर्क राहण्याची गरज आहे.

ते म्हणाले की, लष्कर-ए-तैयबा आणि लष्कर-ए-झांगवी सारख्या पाकिस्तानस्थित गटांची अफगाणिस्तानात छावण्या आहेत. त्यांनी काही गावांमध्ये आणि काबूलच्या काही भागात तालिबानसोबत चेक पोस्ट उभारल्या आहेत. काश्मीरमध्ये सुरक्षा दक्षता वाढवली जाईल परंतु, गोष्टी नियंत्रणात आहेत आणि अफगाणिस्तानमधील पाकिस्तानस्थित गटांकडे परिस्थितीचा वापर करण्याची क्षमता कमी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: मंगळाचे पुष्य नक्षत्रात गोचर! 24 सप्टेंबरनंतर 'या' लोकांवर होणार धनाची बरसात; सकाळी 5:50ची वेळ ठरणार गेमचेंजर

8th Pay Commission Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी! 18000 मूळ वेतन असणाऱ्यांना मिळणार 68 हजारांपेक्षा जास्त बेसिक पे? फिटमेंट फॅक्टर बदलणार नशीब

150 वर्षांची परंपरा; तिसरी पिढीही मूर्तीकलेत व्यस्त, मोरजीतील पोके कुटुंबाची चित्रशाळा; पोर्तुगालमध्येही दिले शिल्पकलेचे धडे

इराणच्या हाती लागला मोठा 'जॅकपॉट'! सापडला 7.5 ट्रिलियन क्यूबिक फीट गॅसचा महाखजिना; नव्या हायड्रोकार्बन साठ्याने अमेरिकेचे दणाणले धाबे

Pre Primary Teachers Salary Hike: पगारवाढीच्या प्रतीक्षेत पूर्वप्राथमिक शिक्षिका, मुख्यमंत्र्यांकडे कैफियत; प्राथमिक शिक्षकांप्रमाणे वेतनवाढीची मागणी

SCROLL FOR NEXT