Crime News Dainik Gomantak
ग्लोबल

America Crime: अमेरिकेत भारतीयांच्या मृत्यूचं सत्र थांबेना! आणखी एका विद्यार्थ्याला गमवावा लागला जीव

America Crime: अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. संशयास्पद परिस्थितीत त्याचा मृत्यू झाला.

Manish Jadhav

America Crime: अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. संशयास्पद परिस्थितीत त्याचा मृत्यू झाला. ही माहिती देताना भारतीय दूतावासाने मृत्यूच्या तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उमा सत्य साई गाद्दे असे विद्यार्थिनीचे नाव आहे. न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, अमेरिकेत भारतीयांचे असे मृत्यू चिंतेचा विषय आहेत.

भारतीय वाणिज्य दूतावासाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ''उमा सत्य साई गाद्दे क्लीव्हलँड, ओहायो येथे शिकत होत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे वाणिज्य दूतावासाच्या वतीने सांगण्यात आले. याशिवाय, दूतावास भारतातील उमा याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. शक्य ती सर्व मदत केली जाईल. याशिवाय उमा याचे पार्थिव लवकरात लवकर भारतात पाठवले जाईल.''

दरम्यान, 2024 च्या सुरुवातीपासून अमेरिकेत किमान अर्धा डझन भारतीय विद्यार्थ्यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. आता अमेरिकेत राहणारे भारतीय या चिंतेत आहेत. गेल्या महिन्यात 34 वर्षीय शास्त्रीय नृत्यांगना अमरनाथ घोष यांची मिसूरीमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यापूर्वी, 23 वर्षीय भारतीय वंशाचा अमेरिकन विद्यार्थी समीर कामथचा मृत्यू झाला होता.

दुसरीकडे, 2 फेब्रुवारी रोजी विवेक तनेजा जखमी अवस्थेत आढळला होता. यानंतर त्याचाही मृत्यू झाला होता. भारतीय विद्यार्थ्यांवरही अनेकदा हल्ले झाले आहेत. तेव्हापासून वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावास आणि इतर वाणिज्य दूतावासही भारतीय विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT