Ukraine  Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: रशियन हल्ल्यामुळे युक्रेन उदध्वस्त, लष्कर भूसुरुंग हटवण्यात व्यस्त

रशिया (Russia) आणि युक्रेनमधील युद्धाला काही दिवसांत दोन महिने पूर्ण होतील.

दैनिक गोमन्तक

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला काही दिवसांत दोन महिने पूर्ण होतील. या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये मोठी नासधूस झाली आहे. रशियन सैन्याने युक्रेनमध्ये विध्वंस घडवून आणला. युक्रेनियन सैन्य आता मकारिव्ह शहरातून भूसुरुंग हटवण्यात गुंतले आहे. बोरोदियान्का ते मकारिव्ह शहराकडे जाताना नष्ट झालेली रशियन वाहने तुम्हाला दिसून येतील. या वाहनांमधून रशियन सैन्याने बॉम्ब आणि इतर युद्धसामुग्री आणल्याचे युक्रेनच्या (Ukraine) लष्कराचे म्हणणे आहे. युक्रेनियन सैन्यांनी रशियन सैन्यांनी आणलेली लष्करी साधनसामग्री जप्त केली. युक्रेनियन लष्करी अधिकाऱ्याच्या मतानुसार, ''आम्ही इथे रोवण्यात आलेल्या भूसुरुंगांचा शोध घेत आहोत आणि भूसुरुंग हटवण्याचे कामही अतिशय काळजीपूर्वक करत आहोत.'' (The Russian attack has caused damage in Ukraine)

खरं तर, युक्रेनच्या सैन्याने रशियन सैन्याला या भागातून पुढे जाऊ दिले नाही. विशेष म्हणजे रशियन सैन्यांची वाहनेही फोडण्यात आली आहेत. या भागातील भूसुरुंगांचा धोका लक्षात घेता, भूसुरुंग तज्ञ या भागातून भूसुरुंग हटवण्यात गुंतले आहेत. युक्रेनचे लष्करही हे बॉम्ब निकामी करण्याचे काम करत आहे. परदेशी मीडिया टीम या भागात वार्तांकन करत आहेत.

दरम्यान, रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी कीवच्या आसपासच्या भागातून माघार घेतली आहे, परंतु फुटीरतावादी भागात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. नेपच्यून क्षेपणास्त्रांनी रशियन युद्धनौका उद्ध्वस्त केल्याचा दावा युक्रेनच्या लष्कराने केला आहे. तर रशियाने प्रत्युत्तरादाखल क्षेपणास्त्र निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्याचा दावा केला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांनीही ब्रिटन, अमेरिका आणि इतर युरोपीय देशांना युक्रेनला शस्त्रे देऊ नयेत, असा इशाराही दिला आहे. रशिया (Russia) आणि युक्रेनमधील युद्धाला 50 दिवसांहून अधिक दिवस झाले असून हे युद्ध अद्याप संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. दोन्ही पक्षांमधील चर्चेतूनही काही निष्पन्न होताना दिसत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT