Muslim Women Dainik Gomantak
ग्लोबल

जगातील 'या' देशांनी हिजाबवर घातली बंदी, हिजाब परिधान केल्यास...

हिजाबवर (Hijab) इतकं राजकारण का? जगात हिजाबबाबत काय तरतूद आहे? मुस्लीम देशांमध्ये हिजाबबद्दलचा दृष्टिकोन काय आहे? जगातील कोणत्या देशांनी हिजाब घालण्यावर बंदी घातली आहे?

दैनिक गोमन्तक

कर्नाटकातून (Karnataka) सुरु झालेल्या हिजाबच्या वादावरुन आता नवा वाद सुरु झाला आहे. कर्नाटक हायकोर्टाने अंतरिम आदेश दिला आहे की, या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत धार्मिक पोशाखावर बंदी असेल, मग तो हिजाब (Hijab) असो किंवा भगवा गमछा. हिजाबवर इतकं राजकारण का? जगात हिजाबबाबत काय तरतूद आहे? मुस्लीम देशांमध्ये हिजाबबद्दलचा दृष्टिकोन काय आहे? जगातील कोणत्या देशांनी हिजाब घालण्यावर बंदी घातली आहे? (The Netherlands Along With France And Belgium Has Banned The Hijab)

हिजाबबद्दल जगातील दोन दृष्टीकोन

हिजाबबाबत जगात दोन मतप्रवाह आहेत. काहींच्या दृष्टीने हा घटनात्मक अधिकार आहे, तर काहींच्या मते शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक पोशाख परिधान करणे योग्य नाही. परंतु जगात असे काही देश आहेत जिथे सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालण्यावर वर्षापूर्वी बंदी घालण्यात आली आहे. एवढंच नाही तर काही देशांनी यासाठी कठोर तरतुदींचा अवलंब केला आहे. तसेच हिजाब घातल्यास मोठ्या दंडाची तरतूदही आहे. शेवटी, कोणत्या देशांमध्ये नकाब घालण्यासाठी शिक्षेची तरतूद आहे?

1- फ्रान्समध्ये कडक निर्बंध: पाश्चात्य देशांमध्ये फ्रान्स (France) हा पहिला देश आहे, ज्याने आपल्या देशात हिजाब परिधान करण्यावर बंदी घातली आहे. फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निकोला सार्कोझी यांनी हा नियम लागू केला. त्यामुळे त्यांना फ्रान्ससह इतर देशातून प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागले. हिजाबवर बंदी घालणारा फ्रान्स हा पहिला युरोपीय देश ठरला आहे. या अंतर्गत कोणतीही महिला पूर्ण चेहरा झाकून घराबाहेर पडू शकत नाही. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाचीही तरतूद आहे. पर्दा हा महिलांवरील अत्याचारापेक्षा कमी नाही, असे फ्रेंच सरकारचे (French Government) म्हणण आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास 150 युरोचा दंड निश्चित करण्यात आला आहे. जर कोणी महिलेला चेहरा झाकण्याची सक्ती केली तर त्याच्यावर 30 हजार युरो दंडाची तरतूद आहे.

2- बेल्जियममध्ये हिजाबवर बंदी: बेल्जियम (Belgium) देखील असा देश आहे, ज्याने आपल्या देशात नकाब घालण्यावर बंदी घातली आहे. बेल्जियमने जुलै 2011 मध्ये पूर्ण चेहरा झाकण्यावर बंदी घातली होती. नव्या कायद्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी अशा कोणत्याही पेहरावावर बंदी घालण्यात आली होती, जी परिधान करणाऱ्याची ओळख उघड होऊ देत नाही. मात्र, या कायद्याविरोधात बेल्जियममध्येही याचिका दाखल करण्यात आली होती, मात्र न्यायालयाने मानवी हक्कांचे (Human Rights) उल्लंघन होत नसल्याचे सांगत ती फेटाळली.

3- नेदरलँड्सच्या संसदेत कायदा: नेदरलँड्समध्ये (Netherlands) शाळा आणि हॉस्पिटलमध्ये इस्लामिक नकाब घालण्यास मनाई आहे. याशिवाय त्यांनी सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करताना हिजाबवर बंदी घालण्याचे समर्थन केले आहे. जून 2018 मध्ये, नेदरलँडच्या संसदेने चेहरा झाकण्यासाठी एक विधेयक मंजूर केले, त्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर झाले.

4- जर्मनी आणि इटलीमध्ये अंशतः लागू: इटलीच्या काही शहरांमध्ये बुरखा घालण्यावर बंदी आहे. हा नियम विशेषतः नोव्हारा आणि लोम्बार्डी शहरांमध्ये लागू आहे. तथापि, हा नियम इटलीच्या पलीकडे लागू होत नाही. जर्मन चान्सलर अँजेला मर्केल देखील बुरखा निर्बंध लागू करण्याच्या बाजूने आहेत. बुरख्यावर बंदी घातली पाहिजे अशा मताच्या त्या आहेत. तथापि, जर्मनीमध्ये अद्याप असा कोणताही कायदा नाही. जर्मनीने न्यायाधीश, सैनिक आणि सरकारी कर्मचार्‍यांसाठी आंशिक बंदी मंजूर केली आहे.

5- ऑस्ट्रिया, नॉर्वे आणि स्पेनमध्ये आंशिक बंदी: ऑस्ट्रिया, नॉर्वे आणि स्पेनमध्ये आंशिक चेहरा झाकण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये, ऑस्ट्रियामध्ये शाळा आणि न्यायालयांसारख्या सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यास बंदी घालण्यात आली होती. 2018 मध्ये पारित झालेल्या कायद्यानुसार नॉर्वेमध्ये (Norway) शैक्षणिक संस्थांमध्ये चेहरा झाकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. स्पेनमध्ये (Spain), 2010 मध्ये, त्याच्या बार्सिलोना शहराने काही सार्वजनिक ठिकाणी जसे की, नगरपालिका कार्यालये, बाजारपेठा आणि ग्रंथालयांमध्ये बुरखा घालण्यावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT