Tedros Adhanom
Tedros Adhanom Dainik Gomantak
ग्लोबल

कोरोनाचा Delta Variant सर्वाधिक संक्रमित होणार प्रकार; WHO चा इशारा!

दैनिक गोमन्तक

जगभरात कोरोनाचा संसर्ग (Covid 19) वाढत असताना कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंट (Delta Plus variant) ची सध्या चर्चा जगभर सुरु आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटमुळे वेगाने प्रतिकारशक्ती निष्प्रभ होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जगातील देशांनी पुन्हा एकदा धास्ती घेतली आहे. भारतामधील (India) दहा राज्यांमध्ये प्रामुख्याने कोरोनाच्या या नव्या प्रकाराचे रुग्ण आढळत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रात डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटचे आत्तापर्यंत 20 रुग्ण आढळून आल्यामुळे चिंता वाढली असतानाच आता जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) डेल्टा प्लसचा मूळ व्हेरिएंट असलेला डेल्टा व्हेरिएंट आजपर्यंत सापडलेल्या विषाणूंमध्ये वेगाने संक्रमण होणारा विषाणू असल्याचं स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या जगभरातल्या नागरिकांनी देखील मास्क घालून ठेवणं आवश्यक असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

जगभरातील 85 देशांमध्ये डेल्टाचे रुग्ण!

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रास (Tedros Adhanom) यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कोरोनाच्या नव्या डेल्टा व्हेरिएंटचं गांभिर्य विषद केले, ''प्रथम भारतामध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या डेल्टा व्हेरिएंटचे जगभरातील सुमारे 85 देशांमध्ये रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत सापडलेल्या कोरोनाच्या या व्हेरिएंटमध्ये हा प्रकार सर्वाधिक वेगाने संक्रमण होणारा प्रकार आहे. नागिरकांनी सार्वजनिक आरोग्य आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. त्यासोबतच या विषाणूला रोखायचं असल्यास जगातील सर्वच देशांमध्ये देशांमध्ये कोरोनाच्या लसीचा पुरवठा व्हायला हवा,'' असे डॉ. टेड्रास म्हणाले. (The most contagious type of Corona Delta Variant; WHO warning)

दरम्यान, यावेळी डॉ. टेड्रास यांनी कोरोनाच्या नव्या प्रकाराला आळा घालण्याचं सूत्र सांगितलं आहे. जेवढं या कोरोना विषाणूचं संक्रमण आपण कमी करु, तेवढे त्याचे व्हेरिएंट कमी असतील, असे ते म्हणाले आहेत. त्यासाठी टेड्रॉस यांनी व्यापक कोरोना लसीकरणाची गरज त्यांनी व्यक्त केली. जगातल्या सर्वच देशामध्ये हे लसीकरण व्हायला हवे, असही त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच टेड्रॉस प्रगत देशांमध्ये होत असलेल्या गर्दीवर देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. ''या देशांमध्ये कुठेही गेलात तर तुम्हाला सर्वत्र गर्दी दिसेल. जणू काही कोरोनाची साथ नसल्याचे वाटेल. मग तुम्ही ज्या देशांमध्ये कोरोना लसींचा पुरवठा मुबलक पुरवठा झालेला नाही त्या देशांमध्ये जा. त्या ठिकाणी तुम्हाला लॉकडाऊन लावलेला दिसेल,'' असे टेड्रॉस यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

Ponda Hospital : फोंडा इस्पितळात ऑगस्टपर्यंत सुविधा पुरवा: विजय सरदेसाई

‘’...सहमतीने संबंध ठेवणे चुकीचे म्हणता येणार नाही’’; HC ची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Labor Day 2024 : कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना कामगार दिनानिमित्त ‘लंच पॅकेट्स’

SCROLL FOR NEXT