Imran Khan  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: राजकारणाच्या खेळपट्टीवर इम्रान खान आऊट, निवडणूक आयोगाने दिला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय

Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे.

Manish Jadhav

Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने आज हा निर्णय दिला.

पाकिस्तानचा माजी कर्णधार राजकारणाच्या खेळपट्टीवर आऊट झाला. त्यामुळे त्यांना आता पाच वर्षे निवडणूक लढवता येणार नाही.

तोशाखाना प्रकरणात नुकतीच इम्रान खान यांना शिक्षा सुनावण्यात आली. विशेष म्हणजे, तुरुंगात असलेल्या इम्रान यांनी कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान दिले होते.

हे प्रकरण आहे

दरम्यान, 1992 मध्ये पाकिस्तानला विश्वचषक जिंकून देणारे इम्रान खान (Imran Khan) 2018 मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. मात्र, वर्षभरापूर्वी अविश्वास ठरावात पराभूत झाल्याने त्यांना पंतप्रधान पदावरुन पायउतार व्हावे लागले.

इम्रान यांच्यावर 100 हून अधिक खटले आहेत. पंतप्रधान असताना स्वतःच्या फायद्यासाठी महागड्या भेटवस्तू विकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. इम्रान यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या जाहीरनाम्यात आपल्या संपत्तीचा तपशील दिलेला नाही.

इम्रान यांनी पंतप्रधान असताना मिळालेल्या भेटवस्तू विकल्याची तक्रार निवडणूक आयोगाने नंतर जिल्हा न्यायालयात दाखल केली होती. या प्रकरणी त्यांना फौजदारी कायद्याद्वारे शिक्षा देण्याची मागणीही करण्यात आली होती.

शनिवारी अटक करण्यात आली

खान (70) यांना इस्लामाबादच्या न्यायालयाने तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर लगेचच शनिवारी अटक करण्यात आली. न्यायालयाने खान यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली. सध्या ते तुरुंगात आहेत.

त्याचवेळी, पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान यांच्या अटकेपासून प्रांताच्या विविध भागांतून 200 हून अधिक पीटीआय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

तथापि, पीटीआयने आरोप केला आहे की, खान यांच्या अटकेचा निषेध करणार्‍या कार्यकर्त्यांना पोलिसांनी (Police) केवळ अटकच केली नाही तर त्यांना ताब्यात घेण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे टाकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT