चीनच्या सैन्य पीएलएने तिबेटमधील (Tibet) हिमालयीन शिखरे काबीज करण्यासाठी मोठा सराव केला आहे. या अभ्यासामध्ये चिनी सैन्याच्या (Chinese Army) 10 हून अधिक लढाऊ तुकड्यांनी 'शत्रू' च्या ताब्यात असलेल्या हिमालयातील शिखर पुन्हा काबीज करण्यासाठी व्यापक अभ्यास केला आहे. चिनी तज्ज्ञांचे मते, चिनी सैन्याच्या या सरावाचा उद्देश भारताला इशारा देणे होता. याआधी लडाख वादादरम्यान भारताने कैलास पर्वताची शिखरे काबीज केली होती, ज्यामुळे चिनी सैन्याला धक्का बसला होता.
दरम्यान, असे मानले जाते की याचे उत्तर देण्यासाठी चिनी सैन्याने तिबेटमधील शिखर पुन्हा हस्तगत करण्याचा सराव केला आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालानुसार, भारताच्या सीमेची देखरेख करणाऱ्या वेस्टर्न थिएटर कमांडने आपल्या सैन्याच्या अनेक ब्रिगेड्स एकत्र केल्या आणि ती दोन गटामध्ये विभागणी केली. एकाचे नाव 'पीएलए' आणि दुसऱ्याचे नाव 'ब्लू आर्मी' असे होते.
शिवाय, अहवालात म्हटले आहे की, दोन दिवस आणि एक रात्र चाललेल्या अभ्यासादरम्यान, पीएलएने शिखरावर जबरदस्त तोफखाना फायर केला, तसेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्ट्राइक केले. या दरम्यान शत्रूवर नजर ठेवण्यात आली आणि हेरगिरीही करण्यात आली. या दरम्यान, 12 सदस्यीय चमूने हल्ल्यासाठी अचूक डेटा गोळा करण्यासाठी 6100 मीटर उंचीवर चढले. या दरम्यान, ब्लू आर्मीचा डेटा गोळा केल्यानंतर, तो त्वरित कमांड सेंटरला पाठविला गेला.
मकाऊस्थित चिनी तज्ज्ञ म्हणतात की, हे तिबेटी सैनिकांची तयारी दर्शवते. आणखी एक चिनी तज्ज्ञ झोउ चेनमिंग म्हणतात की, इथली ब्लू आर्मी म्हणजे भारतीय सैन्य. ते पुढे म्हणाले की या व्हिडिओचा उद्देश तिबेटच्या माउंटन ब्रिगेडच्या भारतीय बाजूला इशारा देणे होता. चिनी सैन्याची बैयुन्शन रेजिमेंट युद्धासाठी पूर्णपणे तयार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.