Work From Home: वर्किंग टाइम संपल्यानंतर बॉसने कॉल केला तर..  Dainik Gomantak
ग्लोबल

Work From Home: वर्किंग टाइम संपल्यानंतर कर्मचाऱ्याला कॉल केल्यास बॉस येणार गोत्यात

या नवीन नियमानुसार कोणत्याही कंपनीच्या बॉसने 'वर्क फ्रॉम होम' ची वेळ संपल्यानंतर कर्मचाऱ्याला कॉल केला तर शिक्षा होऊ शकते.

दैनिक गोमन्तक

कोरोना (Corona) संसर्गाने जगाला काम करण्याची पद्धत बदलण्यास भाग पाडले आहे. या महामारीनंतर लॉकडाउन (Lockdown) दरम्यान लोकांनी त्यांच्या रोजच्या दिन दिनचर्येतून कार्यालयात काम करण्याची पद्धत बदलली. कोरोनाच्या लॉकडाउननंतर संपूर्ण देशात घरून काम करण्याची पद्धत जरा जास्तच वाढली आहे. पोर्तुगालमध्येही (Portugal) वर्क फ्रॉम होम (Work From Home) करण्याबाबत नविन नियम (Rules) तयार करण्यात आला आहे. हा नियम लागू होण्यापूर्वीच त्याची जगभर चर्चा सुरू आहे. काही लोक नियमांचे कौतुक देखील करत आहेत, तर काही लोकांचा असा विश्वास आहे की या नियमामुळे लोकांच्या कामावर परिणाम होऊ शकते.

या नव्या नियमानुसार "वर्क फ्रॉम होम" करण्याची वेळ संपल्ल्यानंतर, कोणत्याही कंपनीच्या बॉसने त्याच्या कर्मचाऱ्याला फोन केला, तर त्याला शिक्षा होऊ शकते. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक अंतर ठेवणे हा सर्वात प्रभावी मार्ग आणला जातो. हे लक्षात घेता जगातील अनेक देशांमध्ये बहुतांशी कंपन्या वर्क फ्रॉम होम करून घेत आहेत.

* लोकांमध्ये तणाव वाढत आहे

अनेक कंपन्यामध्ये साफसफाई केल्यानंतर कार्यालये स्वच्छ करून पुन्हा लॉक लावण्यात येत आहे. त्याचवेळी ऑफिसच्या कामामुळे घरातील बहुतेक लोक या दिवसांत ताणावाचे बळी ठरत आहेत. तरीही काही लोक घरून काम केत आहेत. त्याचवेळी काही जणांनी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी लोककधी त्यांच्या कामाच्या तणावाखाली राहतात तर कधी घराशी संबंधित समस्यामुळे, जे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकता.

* रीमोट वर्किंग करणे सोपे करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले

रीमोटवर काम करणे शक्य तितके सोपे करण्यासाठी पोर्तुगीज सरकारने एक प्रभावी पाऊल उचलले आहे. एक अहवालानुसार , "ज्या संस्था, कामाची ठिकाणे, ज्या कंपन्यामध्ये 10 किंवा त्यापेक्षा कमी कर्मचारी काम करतात त्यांना हा नवीन कायदा लागू होणार नाही. तेथे सोशल डिस्टन्सिंगसारख्या त्रासदायक उपायांचा प्रश्नच निर्माण होत नाही. कारण तिथे आधीच गर्दी नाही. हा नवा कायदा ज्या संस्था, कामाची ठिकाणे, 10 पेक्षा जास्त लोक काम करतात अशाकहा ठिकाणी हा नवा नियम लागू होणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: बाबू आता काय करतील?

403 पदांसाठी 10 मे रोजी परीक्षा होणार, कर्मचारी भरती आयोगाकडून माहिती जारी; परीक्षा केंद्रात बदल नाही

प्रदूषण मंडळ, आरोग्य खाते करणार तलावाची पाहणी; पांगम यांची माहिती, मंगळवारी होणार सुनावणी

Lairai Jatra: शिरगावात 'देवी'चा जयघोष, भक्तांना आस दर्शनाची; जत्रा निर्विघ्नपणे साजरी होण्यासाठी 'लईराई'ला साकडे

Goa Weather: कडक उन्हात पावसाची एन्ट्री; राज्यात पुढील तीन दिवस 'अवकाळी'चे संकट, 'यलो अलर्ट' जारी

SCROLL FOR NEXT