Elon Musk Goes Shirtless Dainik Gomantak
ग्लोबल

Elon Musk Goes Shirtless: इलॉन मस्क यांचा शर्टलेस लूक पाहिलात का?

टेस्ला, स्पेस एक्सचे निर्माते मस्क सध्या मित्रांसोबत ग्रीस मध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

नेहमी सुटा-बुटात आणि बिझनेस मॅगझिनच्या पेजवर झळकणारा, जगप्रसिद्ध उद्दयोजक इलॉन मस्कचा शर्टलेस (Elon Musk Goes Shirtless) लूक सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इलॉन मस्क सध्या ग्रीसमध्ये (Greece) असून, आपल्या मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेत आहेत. प्रसिद्धीझोतात आल्यापासून पहिल्यांदाच मस्क यांचा असा हटके अंदाज समोर आल्याने नेटकरी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

अब्जाधीश असलेले मस्क ग्रीस मधील मायकोनोस येथे एका यॉचवरती (yatch) सनबाथ घेताना शर्टलेस दिसून आले. यापूर्वी मस्क अशा अवतारात कधीच दिसले नसल्याने नेटकरी फोटो शेअर करत, मजेशीर कमेंट करत आहेत. तब्बल 20,000 डॉलर एका आठवड्याला असे या चार्टर यॉचचे दर आहेत. यामध्ये तीन केबिन असून सहा लोक बसू शकतात तसेच, त्यांना सेवा देण्यासाठी एक व्यावसायिक क्रू उपलब्ध आहे. अशी माहिती पेज सिक्सने प्रसिद्ध केली आहे.

टेस्ला, स्पेस एक्स (Tesla, SpaceX) सारख्या जगविख्यात कंपनी आणि नाविण्यपूर्ण स्टार्टअपची निर्माती इलॉन मस्क यांनी केली आहे. तरूणवर्गात त्यांची मोठी क्रेझ आहे. ट्विटर (Twitter) देखील मस्क यांनी तब्बल 44 बिलियन डॉलरची बोली लावून खरेदी केले मात्र, दोनच दिवसांपूर्वी त्यांनी ट्विटर खरेदीची बोली मागे घेत असल्याचे जाहीर करून सर्वांना धक्का दिला. ट्विटरच्या मुळ मालकाने याबाबत न्यायालयीन लढा देणार आसल्याचे सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT