Imran khan  Dainik Gomantak
ग्लोबल

इम्रान खान यांना जिवे मारण्यासाठी दहशतवादी कट, यंत्रणांनी दिला इशारा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येचा कट दहशतवादी रचत आहेत.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येचा कट दहशतवादी रचत आहेत. यासाठी त्यांनी अफगाणिस्तानातील एका दहशतवाद्याची मदतही घेतली असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, दहशतवाद विरोधी विभाग, खैबर पख्तूनख्वा विंगने हा इशारा दिला आहे. 'जंग' या पाकिस्तानी वृत्तपत्रातील वृत्तात म्हटले आहे की, दहशतवादविरोधी विभागाने इम्रान खान यांच्या सुरक्षेसंबंधी यंत्रणांना सूचना दिल्या आहेत. (terrorists planning to assassinate imran khan pakistans counter terrorism department warns)

18 जूनला अलर्ट जारी करण्यात आला होता?

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने वृत्तपत्राने सांगितले की, विभागाने 18 जून रोजी अलर्ट जारी केला होता. तथापि, धमकी गुप्त ठेवण्याचे आणि सोशल मीडियावर लीक होण्यापासून रोखण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या (PTI) नेत्यांनी अलीकडच्या काही दिवसांत इम्रान खान (Imran khan) यांना असलेल्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पीटीआय नेते फयाज चौहान यांनी म्हटले आहे की, माझ्याकडे अशी माहिती आहे की, अफगाणिस्तानमधील (Afghanistan) 'कोची' नावाच्या दहशतवाद्याला इम्रान खान यांना मारण्याचा आदेश काही लोकांनी दिला आहे.

शाहबाज शरीफ यांनी शक्य तितक्या सुरक्षिततेचे आश्वासन दिले

विश्वासदर्शक ठराव गमावल्यानंतर इम्रान खान अडीच महिन्यांपासून सत्तेबाहेर आहेत. सत्तेत असताना, त्यांनी बायडन सरकारवर गंभीर आरोप केले होते. मात्र दुसरीकडे, वॉशिंग्टनने इम्रान खान यांचे फेटाळून लावले. आपल्या जीवाला धोका असल्याचे इम्रान खान यांनी मे महिन्यात म्हटले होते. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी सुरक्षा यंत्रणांना इम्रान खान यांना शक्य ती सर्व सुरक्षा देण्याचे निर्देश गृह मंत्रालयाला दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

SCROLL FOR NEXT