Terrorist Attack in Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

Terrorist Attack in Pakistan: हल्लेखोर दुचाकीवरून आला अन् थेट... पाकिस्तानात मोठा दहशतवादी हल्ला; 18 जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

Terrorist Attack in Pakistan 18 killed: पाकिस्तानच्या अशांत सीमावर्ती भागात दहशवाद्यांनी पुन्हा एकदा रक्ताचा खेळ खेळला आहे.

Sameer Amunekar

पाकिस्तानच्या अशांत सीमावर्ती भागात दहशवाद्यांनी पुन्हा एकदा रक्ताचा खेळ खेळला आहे. अफगाणिस्तान सीमेजवळील मीरानशाह भागात एका आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेली दुचाकी लष्करी चौकीवर धडकवली. या भीषण स्फोटात १८ लोकांचा बळी गेला असून, मृतांमध्ये ५ लहान मुलांचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या हल्ल्यात ३० हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भीषण स्फोटाने बाजारपेठ हादरली

हा हल्ला काल सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास मीरानशाह येथील 'चश्मा पुल' भागात झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आत्मघातकी हल्लेखोर दुचाकीवरून आला आणि त्याने थेट लष्करी तपासणी नाक्याला (चेक पोस्ट) धडक दिली. स्फोट इतका शक्तिशाली होता की, दुचाकी आणि चौकीचे अक्षरशः तुकडे झाले. बाजारपेठेत गर्दीची वेळ असल्याने स्फोटामुळे अनेक दुकानांना भीषण आग लागली, ज्यामध्ये अनेक नागरिक होरपळले गेले.

हाफिज गुल बहादूर: हल्ल्याचा मुख्य सूत्रधार

या क्रूर हल्ल्याची जबाबदारी 'उस्तुद उल खोरासन' (USK) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. ही संघटना 'इत्तिहाद उल मुजाहिदीन पाकिस्तान' (IMP) शी संबंधित असून, ज्याचा प्रमुख कुख्यात दहशतवादी हाफिज गुल बहादूर आहे. बहादूरनेच या आत्मघातकी हल्ल्याचा संपूर्ण कट रचला होता. या गटाने पाकिस्तानातील बाजारपेठेत लष्करी चौकीला लक्ष्य करून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ केला आहे.

मसूद अजहर आणि ISI कनेक्शन उघड

तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, मास्टरमाइंड हाफिज गुल बहादूरचे संबंध जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरशी आहेत. विशेष म्हणजे, बहादूरला पाकिस्तानची गुप्तचर संस्था 'ISI' ने प्रशिक्षण दिले होते. मसूद अजहरच्या बन्नू येथील प्रशिक्षण केंद्रात त्याने दहशतवादाचे धडे गिरवले होते. अफगाणिस्तानातून पाकिस्तानात आलेल्या बहादूरने मसूद अजहरच्या साथीने भारतात, विशेषतः काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले करण्यासाठी अनेक अतिरेकी तयार केले होते.

मदरशांमधून दहशतवादाचे पीक

हाफिज गुल बहादूर स्वतःचा मदरसा चालवत असे, जिथे तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादी कारवायांसाठी तयार केले जात असे. लाल मशीद प्रकरणानंतर जेव्हा 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' (TTP) अस्तित्वात आली, तेव्हा बहादूर त्यामध्ये सामील झाला आणि त्याने पाकिस्तान सरकारविरुद्धच युद्ध पुकारले. आज हीच दहशतवादाची फॅक्टरी स्वतः पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT