America Shootout News Dainik Gomantak
ग्लोबल

America Crime News: अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये बंदूकधाऱ्यांची दहशत, रॅपिड फायरिंगमध्ये 4 जणांचा मृत्यू

America Crime News: अमेरिकेत गोळीबाराच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीयेत. अमेरिकेतील पोलिस गुन्हेगारांवर कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत.

Manish Jadhav

America Crime News: अमेरिकेत गोळीबाराच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीयेत. अमेरिकेतील पोलिस गुन्हेगारांवर कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे अमेरिकन शहरे, शाळा, बाजारपेठ, पब, बार आणि रेस्टॉरंटमध्ये दररोज गोळीबाराच्या घटना सातत्याने पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अमेरिकन लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. अमेरिकेच्या हायटेक पोलिसांसमोर गुन्हेगार सातत्याने आव्हान उभे करत आहेत. अशा गुन्हेगारी घटनांना आळा घालणे देखील अमेरिकन पोलिसांसाठी आव्हान बनले आहे. ताज्या घटनेत लॉस एंजेलिसमध्ये चार जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने घबराट पसरली आहे.

दरम्यान, लॉस एंजेलिसमध्ये शनिवारी गोळीबाराची घटना घडली. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. मात्र, ही हत्या नसून आत्महत्येचे प्रकरण असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. लॉस एंजेलिस पोलिस विभागाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, लेर्डो अव्हेन्यूच्या 11600 ब्लॉकमध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिस संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. मात्र यादरम्यान 4 जणांचा मृत्यू झाला होता. संपूर्ण परिसरात लोकांमध्ये घबराटीते वातावरण होते.

लॉस एंजेलिस पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळी चार जणांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, मृतांबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. तसेच, गोळीबार का झाला हे देखील सांगण्यात आलेले नाही. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेण्यात व्यस्त आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch Club Case: 'बर्च' क्लबच्या बनावट NOC प्रकरणात लुथरा बंधूंच्या जामिनावर पुन्हा सुनावणी; 2300 पानी दोषारोपपत्रामुळे प्रकरण गंभीर

GFA Award: गोव्याच्या फुटबॉलमधील दोन दिग्गजांचा गौरव! शिवानंद साळगावकर, मॉरिसियो आफोन्सो यांना जीवनगौरव पुरस्कार

Headland Sada Shed Case: 'मुरगावचा राजा'च्या अनधिकृत शेडवर हायकोर्टचा दणका! बुधवारपर्यंत पाडकाम करा, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई

Hospital Staff Shortage: रुग्णसंख्या चौपट वाढली, कर्मचारी मात्र जैसे थे! मडगाव जिल्हा इस्पितळावर दररोज 2 हजार रुग्णांचा भार; 193 पदे रिक्त

Goa Politics: महाआघाडीची खिचडी शिजेना; काँग्रेसच्या नेत्यांची चिंता मिटेना! विरोधकांचे दरवाजे खुले, पण हातमिळवणीला मात्र खिळे

SCROLL FOR NEXT