Taliban Spokesperson Muhammed Suhail Shaheen threaten India Dainik Gomantak
ग्लोबल

"सैन्य आले तर याद राखा" तालिबान्यांची भारताला धमकी

तालिबानने (Taliban) भारताला अफगाणिस्तानमध्ये लष्करी (Indian Army) उपस्थिती म्हणून सहभागी न होण्याचा इशारा वजा धमकीच दिली आहे.(Suhail Shaheen)

दैनिक गोमन्तक

तालिबानच्या (Taliban) वतीने अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) भारताद्वारे (India) चालवल्या जाणाऱ्या प्रकल्पांबाबत निवेदन जारी करण्यात आले आहे. यासोबतच तालिबानने भारताला अफगाणिस्तानमध्ये लष्करी (Indian Army) उपस्थिती म्हणून सहभागी न होण्याचा इशारा वजा धमकीच दिली आहे. तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद सुहेल शाहीन (Suhail Shaheen) म्हणाला की, आम्ही भारताचे धरणे, राष्ट्रीय पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसह अफगाणिस्तानच्या लोकांसाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीचे कौतुक करतो.(Taliban Spokesperson Muhammed Suhail Shaheen threaten India)

अफगाणिस्तानच्या लोकांच्या विकास, पुनर्बांधणी आणि आर्थिक समृद्धीसाठी भारताकडून जे काही केले जात आहे ते कौतुकास पात्र आहे. आम्ही आमच्या बाजूने दूतावास आणि मुत्सद्यांना कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. आम्ही कोणत्याही दूतावास किंवा मुत्सद्याला लक्ष्य करणार नाही. आम्ही आमच्या निवेदनात हे अनेक वेळा सांगितले आहे, ते आमच्या बांधिलकीचा भाग आहे.असे सांगत त्याने भारताविषयीचे आपले मत स्पष्ट केले आहे.

तालिबानचा प्रवक्ता मोहम्मद सुहेल शाहीन म्हणाला की, तालिबानचे पाकिस्तानस्थित दहशतवादी गटांशी असलेले सखोल संबंध निराधार आहेत. ते ग्राउंड रिअ‍ॅलिटीवर आधारित नाहीत, तर राजकीयदृष्ट्या प्रेरित उद्दिष्टांवर आधारित आहेत. तालिबान भारताला खात्री देऊ शकतो की, अफगाणिस्तानची माती त्याच्या विरोधात वापरली जाणार नाही, असे तालिबान प्रवक्त्याने सांगितले, "तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले की, भारतीय शिष्टमंडळाने आमच्या शिष्टमंडळाला भेटल्याच्या बातम्या आहेत, पण मी याची पुष्टी करू शकत नाही. माझ्या माहितीनुसार, एक (वेगळी) बैठक झाली नाही, पण आमची काल दोहा येथे बैठक झाली, ज्यात एक भारतीय शिष्टमंडळ देखील उपस्थित होते.

त्याचबरोबर अफगाणिस्तानच्या पक्तिया येथील गुरुद्वारातून निशान साहिब हटवल्याबद्दल तालिबानच्या प्रवक्त्याने स्पष्टीकरण देत शीख समाजाने हा ध्वज काढला असल्याचे सांगितले आहे. जेव्हा आमचे सुरक्षा अधिकारी तेथे गेले तेव्हा त्यांनी सांगितले की जर त्यांनी ध्वज पाहिला तर कोणीतरी त्यांना त्रास देईल. आमच्या लोकांनी त्याला आश्वासन दिले आणि त्यांनी झेंडा पुन्हा फडकवला.

भारत अफगाणिस्तान ला जी मदत करते त्याबद्दल त्याने भारताचे कौतुक करत जर भारताने सैन्य कारवाई केली तर शांत बसणार नाही असा इशाराच दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT