Taliban’s new order Dainik Gomantak
ग्लोबल

महिलांनी स्वत:ला डोक्यापासून टाचांपर्यंत घ्यावे झाकून, तालिबानचा नवा आदेश

तालिबानने गेल्या वर्षी 15 ऑगस्टला देशाची सूत्रे हाती घेतल्यापासून विविध आदेशांद्वारे सामान्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने आणली आहेत.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानमधील सत्तेची सूत्रे हाती असलेल्या तालिबान संघटनेने देशातील महिलांना डोक्यापासून टाचांपर्यंत शरीर झाकले जाईल असे कपडे परिधान करण्याचे आदेश दिले आहेत. तालिबानच्या या आदेशामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या सरकारला मान्यता मिळण्याची शक्यता आणखी अस्पष्ट झाली आहे. तालिबानने गेल्या वर्षी 15 ऑगस्टला देशाची सूत्रे हाती घेतल्यापासून विविध आदेश जारी करून सामान्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने आणली आहेत. नव्या आदेशात महिलांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच, घराबाहेर पडताना डोक्यापासून टाचांपर्यंत शरीर झाकले जाईल, असेच कपडे परिधान करावे. या आदेशाचा भंग केल्यास त्यांच्या घरातील पुरुषांना शिक्षा केली जाईल आणि जितक्यावेळा महिलांकडून नियमभंग होईल, पुरुषांना तितकीच अधिक तीव्र शिक्षा केली जाईल, असेही तालिबानने बजावले आहे. (Taliban’s new order News)

महिला (Women) आणि सामान्य जनतेवर लादलेल्या बंधनांमुळेच तालिबानच्या सरकारला आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मान्यता मिळालेली नाही. तालिबानने अनेक देशांना पत्र पाठवून संबंध प्रस्थापित करण्याची केलेली विनंती देखील दुर्लक्षित राहिली आहे. अफगाणिस्तानमधील मानवाधिकारांच्या स्थितीबाबत अनेक देश आणि मानवी हक्क संघटना चिंतेत आहेत.

तालिबानने अनेक आदेश जारी केले असले तरी त्याची अंमलबजावणी जनतेकडून किती प्रमाणात विरोध हे महत्वाचे आहे. गेल्याच महिन्यात तालिबानने (Taliban) आदेश काढत महिलांना एकटीने प्रवास करण्यास मनाई केली. मात्र, त्याला जोरदार विरोध होताच हा आदेश गुंडाळण्यात आला आहे. तसेच, मुलींच्या शिक्षणावर बंदी घालण्याच्या आदेशाला विरोध झाल्यानंतर त्यांच्या शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT