Taliban leader Mullah Baradar could become Afghan president Dainik Gomantak
ग्लोबल

तालिबानी नेता 'मुल्ला बरादर' होणार अफगाणचा राष्ट्राध्यक्ष? जाणुन घ्या

Afghanistan: अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड टॉवरवर तालिबान्यांनी (Taliban) हल्ला केल्यानंतर अमेरिकेने तालिबानला गुडघे टेकायला लावल्यानंतर मुल्ला बरदारने दहशतवादाची सूत्रे हाती घेतली.

दैनिक गोमन्तक

मुल्ला अब्दुल गनी बरादर (Mullah Ghani bardar) हे त्या चार लोकांपैकी एक आहेत ज्यांनी 1994 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानची चळवळ सुरू केली. अफगाणिस्तानात सत्ता हस्तांतरित झाल्यानंतर ज्यांच्याकडे तालिबानची कमान सोपवली जाण्याची शक्यता आहे, अशा लोकांपैकी एक महत्वाचं नाव म्हणजे मुल्ला बरदार हे आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती कार्यालयात तालिबान आणि आफगाणिस्तान सरकारच्या चर्चेची प्रक्रीया सुरु असतानाच तालिबान्यांनी मुल्ला बरादर यांना भावी अध्यक्ष घोषित केले आहे. जाणुन घेऊया कोण आहेत मुल्ला बराबर. अफगाणिस्तानच्या स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सत्ता हस्तांतरणाची प्रक्रीया

अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड टॉवरवर तालिबान्यांनी हल्ला केल्यानंतर अमेरिकेने तालिबानला गुडघे टेकायला लावल्यानंतर मुल्ला बरादरने दहशतवादाची सूत्रे हाती घेतली. तसेच, तो जास्त काळ मुक्त राहू शकला नाही. त्याला फेब्रुवारी 2010 मध्ये अटक करण्यात आली. तो पाकिस्तानच्या कराची शहरातून अमेरिका-पाकिस्तानच्या संयुक्त कारवाईत पकडला गेला. 2012 च्या अखेरीपर्यंत मुल्ला बरादरबद्दल फारशी चर्चा झाली नाही. तालिबानी कैद्यांच्या त्या यादीत त्याचे नाव अव्वल आहे ज्यांना अफगाण शांतता चर्चेला प्रोत्साहन देण्यासाठी सोडू इच्छित होते.

पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी 21 सप्टेंबर रोजी मुल्ला बरदारची सुटका केली होती, पण त्याला पाकिस्तानात ठेवले जाईल की तिसऱ्या देशात हद्दपार केले जाईल हे स्पष्ट झाले नाही. मुल्ला बरादरचे महत्त्व या वस्तुस्थितीवरून लक्षात येते की, अटकेच्या वेळी तो तालिबान नेता मुल्ला मोहम्मद उमरचा सर्वात विश्वासू कमांडर मानला जात होता. यासोबतच त्याला सेकंड-इन-कमांड असेही म्हटले गेले. मुल्ला बरादर त्या दहशतवाद्यांपैकी एक आहे जो अमेरिका आणि अफगाणिस्तान सरकारशी चर्चेला पाठिंबा देतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT