Taliban Dainik Gomantak
ग्लोबल

सरेंडर करो या मारे जाओ’! तालिबान्यांची परदेशी सैन्यांना मदत करणाऱ्या लोकांना नोटीस

तालिबानी (Taliban) बंडखोर घरोघरी जाऊन अमेरिकन आणि त्याच्या सहयोगी दलांना (US and Allied Forces) मदत करणाऱ्या लोकांचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेने (America) अखेर दोन दशकांनंतर अफगाणिस्तानमधील (Afghanistan) आपले मिशन संपवले आहे. परंतु परदेशी सैन्यांना मदत करणारे लोक तालिबानच्या (Taliban) राजवटीमध्ये मागे राहिले आहेत. ते एका कठीण काळाला सामोरे जात आहेत. तालिबानी बंडखोर घरोघरी जाऊन अमेरिकन आणि त्याच्या सहयोगी दलांना (US and Allied Forces) मदत करणाऱ्या लोकांचा शोध घेत आहेत. तालिबानी बंडखोर (Taliban insurgents) अशा लोकांच्या घराबाहेर पत्र किंवा नोटीस लावत आहेत, 'आत्मसमर्पण करा किंवा मरा' असा इशारा देत आहेत.

डेली मेलच्या अहवालानुसार, दारावरील नोटीसमध्ये लोकांना तालिबानने बोलावलेल्या न्यायालयात जाण्यास सांगितले आहे, जेणेकरुन त्यांना शिक्षा होऊ शकेल. न्यायालयात हजर न झाल्यास फाशीची शिक्षा दिली जाईल, असाही इशारा या नोटीसमध्ये देण्यात आला आहे. डेली मेलने अशा अनेक लोकांशी संवाद साधला ज्यांना अशा नोटिसा तालिबानने पाठविल्या आहेत. हेलमंड प्रांतात ब्रिटिश लष्कराला रस्ते बांधण्यास मदत करणाऱ्या एका बांधकाम कंपनीच्या मालकाने सांगितले की, तो लपून बसला आहे कारण त्याला मृत्यूची होती. एका 34 वर्षीय व्यक्तीने असेही सांगितले की, त्याच्या घराबाहेर जी नोटीस लावण्यात आली होती त्यावर तालिबानचा शिक्काही होता.

तालिबानच्या शासन शैलीत कोणताही बदल झालेला नाही

20 वर्षांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये सत्तेत असताना तालिबानने अफगाणिस्तानमधील गावांमध्ये अशा सूचनांचा वापर केला होता. त्यांच्या माध्यमातून धमक्या दिल्या जात होत्या. परंतु यावेळी, या नोटिसा आता शहरांमध्येही लावल्या जात आहेत. यामधून हे दर्शवते की, तालिबानी नेत्यांनी या गटाला माध्यम म्हणून चित्रित केले असले तरी, बंडखोरांच्या गटाची शासन शैली बदलेली आहे. त्याच वेळी, अमेरिकेने सोमवारी आपली अमेरिकन मोहीम संपवली आहे. त्यानंतर तालिबान्यांनी विजय घोषित केला असून यावेळी तालिबानी दहशतवादी आनंदउत्सव साजरा करताना दिसले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT