Representative Image Dainik Gomantak
ग्लोबल

Video: तालिबान्यांनी हेलिकॉप्टरला मृतदेह लटकवून कंधारवर घिरट्या घातल्या

'तालिबान टाइम्सस' नामक एका ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

तालिबानने (Taliban) आपला खरा चेहरा दाखवायला सुरुवात केली असल्याचा इशारा देणारे काही दृष्य आता अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) पहायला मिळता आहेत. तालिबान्यांनी कंधारमध्ये (Kandhar) अमेरिकेच्या लष्करी हेलिकॉप्टरला एक मृतदेह लटकवून घिरट्या घातल्याचे दिसून आले आहे. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. ज्या ट्विटर हॅंडलवरुन हा व्हीडीओ समोर आला, त्या ट्विटर हॅंडलला तालिबान आपले अधिकृत ट्विटर हँडल असल्याचा दावा करते. अनेक पत्रकारांनी हे ट्विट शेअर केले आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपले सैन्य पूर्णपणे काढून घेतल्यानंतर हे ट्विट व्हायरल होत आहे. नुकतेच सर्व अमेरिकन सैनिकांनी अफगाणिस्तान सोडले.

'तालिबान टाइम्स' नामक एका ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे. "अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातीचे अधिकृत इंग्रजी-भाषेतील अकाऊंट" असे या ट्विटरच्या बायोमध्ये लिहीले आहे. या हँडलने दावा केला आहे की हेलिकॉप्टर 'शहरात गस्त घालत आहे. ट्विटमध्ये लिहिले आहे, "आमचे हवाई दल! यावेळी इस्लामिक अमिरातीच्या हवाई दलाचे हेलिकॉप्टर कंधार शहरावर गस्त घालत आहेत. '

रिपब्लिकन सिनेटर टेड क्रुझ यांनी व्हिडिओ शेअर करताना अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी ट्विट केले, 'अफगाणिस्तानमध्ये बिडेन यांच्यामूळे झालेल्या विध्वंसाचे चित्र दाखवणारे हे भयानक दृष्य आहे.

तालिबानने एका अमेरिकन ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरमधून एका व्यक्तीला फाशी दिली. ही घटना दुखद आहे’ त्याच वेळी, अनेक ट्विटर युजर्सने हा खरच कोणाचा मृतदेह आहे की, डमी आहे असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT